Thursday, May 9, 2024

Latest Posts

BJP आता घाबरली आहे, ठाकरे गटाच्या नेत्याचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाडण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांनी रिंगणात उतरावे, असे प्रयत्न सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश आल्यास कुठेही लोकसभेची निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे इंडिया आघाडीच्या युवकांचा मेळावा पार पडला. त्यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना कल्याणच्या लोकसभेबाबत विचारणा केली असता, पक्ष प्रमुखांनी निवडणूक लढवायला सांगितली तर, माझी तयारी असल्याचे सांगून कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले. महायुतीमध्ये मनसेच्या प्रवेशाबाबत बोलताना सरदेसाई म्हणाले की, भाजपने मतदारांना गृहीत धरले असून, प्रामुख्याने जैन, गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाला, जैन धर्माचा अपमान करणाऱ्या आणि उत्तर भारतीयांना मारणाऱ्या मनसेला भाजपने सोबत घेतले आहे, याचा धडा मतदार नक्कीच शिकवतील.

ठाकरे गटाचे शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी बीजेपी-मनसे युतीबद्दल भाष्य केले. एकटे उद्धव ठाकरे हे भाजप पासून लांब झाल्यानंतर त्यांची कमी भरण्याकरता हा भाजपचा हा खटाटोप सुरू आहे. १००% मनसे सारखा पक्ष हे भाजप सोबत जात असाल तर आजपर्यंत उत्तर भारतीय आणि जैन समाज भाजप स्वतःचा गड मानत होते, तो गड ढासळणार असे ते म्हणाले. यासोबतच, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत विचारले असता, लोकशाही जवळपास संपत आलेली आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात जो विरोधी पक्षाचा नेता आवाज उठवतो त्यावेळी ईडी, सीबीआय अशा प्रकारचे यंत्रणा लागते ते उघड झाले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासारखे अत्यंत लोकप्रिय ज्यांनी कमी वेळात दोन राज्य जिंकली अशा नेत्यांना अटक होते तेव्हा भाजप किती घाबरली आहे, ते दिसून येत असल्याचे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

हे ही वाचा:

देशात पहिली निवडणूक कधी पार पडली? कोणत्या राज्यात झाले पहिले मतदान, जाणून घ्या सविस्तर माहिती

महाविकास आघडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग, हिंदू बंधू-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? एकनाथ शिंदेनी साधला ठाकरेंवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss