Sunday, May 5, 2024

Latest Posts

Chhagan Bhujbal यांच्या Loksabha उमेदवारीवरून Amol Kolhe यांचा मोठा गौप्यस्फोट, भुजबळांनी दिले प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) पहिला टप्पा पार पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Loksabha Constituency) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबतीत गौप्यस्फोट करत, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्याविरोधात छगन भुजबळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सांगितले होते. मात्र, भुजबळांनी शिरूरमधून लढण्यास नकार दिला.” असे सांगितले आहे. याबाबत आता छगन भुजबळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांनी याबाबत प्रतिक्रिया देत या बातमीला दुजोरा दिला आहे. “नाशिकमधून माझे नाव फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूरमधून निवडणूक लढता का? अशी विचारणा केली होती. मी शिरूरमधून लोकसभा लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असं त्यामागचा हेतू होता. मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला,” असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला होता. यानंतर ओबीसी समाज नाराज झाल्याचे बोलले जात होते. याबाबत छगन भुजबळ यांना विचारणा केली असता ते म्हणाले, “मला उमेदवारी नाही म्हणून कोणी नाराज आहे असे नाही. लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करत असतात. सगळ्या गोष्टी आता मागे पडल्या आहेत.”

हे ही वाचा:

PM Modi यांच्यामुळे आपला देश अर्थव्यवस्थांमध्ये…काय म्हणाले Dr. Shrikant Shinde?

सत्ता जाण्याच्या भीतीने विरोधक घाबरले आहेत, Rahul Gandhi यांचा PM Modi, BJP वर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss