Thursday, May 9, 2024

Latest Posts

झुंडशाही,पवार पर्व संपवण्यासाठी आपली लढाई – विजय शिवतारे

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे(Vijay Shivatare) यांनी बारामतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे(Vijay Shivatare) यांनी बारामतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चंना उधाण आले आहे. विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार अशी लढत येत्या निवडणुकीमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोठी घोषणा केली आहे. बारामती मतदार संघातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. तसेच येत्या १२ तारखेला निवडणुकीचा अर्ज भरणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात सभा घेणार असल्याचे विजय शिवतारे म्हणाले.

विजय शिवतारे म्हणाले, केवळ जनतेची लढाई म्हणून, गुंडशाही आणि घराणेशाहीच्या विरोधात लढण्यासाठी विजय शिवतारे बापू जनतेची लढाई म्हणून यात उतरला आहे. देवाला मी सांगितलं तू आशीर्वाद दे, जनतारुपी मतदान होऊ दे, महाराष्ट्रात जो राजकीय चिखल झाला आहे. कोण कुठे जात आहे? कोण काय करत आहे. याबाबत नवीन आशा सर्वसामान्य लोकांच्या मनात झाली आहे. एक नवीन पर्याय, नवीन पर्व विजय शिवतारेंच नव्हे तर सर्वसामान्य सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा. कुणाला पाडण्यासाठी किंवा कुणाला मदत करण्यासाठी नव्हे तर पवार पर्व संपवण्यासाठी, हे पवार आडनाव नाही, तर ही घराणेशाही आहे. झुंडशाही आहे, असे विजय शिवतारे म्हणाले. ४० वर्षांनंतर यांना मतदान करायचं असे इतर मतदारसंघातील लोक विचारात आहेत . यांना कशासाठी मतदान करायचे, शरद पवारांनी आम्हाला काय दिलं, अजित पवारांनी आम्हाला काय दिलं, उलट प्रचंड अत्याचार केला आहे. पुणे जिल्ह्यात पवार सोडून दुसरे कोणी निर्माण नाही झालं पाहिजे. जिल्ह्यात दुसरे कोणी मोठं होऊ नयेत, सर्वांचे पाय कापण्याचे काम केलं. ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय. कुणाला हरवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी नव्हे, तर पवार नावाची झुंडशाही आणि हुकूमशाही संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारले आहे. त्यामुळे कोणीही मनात शंका ठेवू नका, असे विजय शिवतारे म्हणाले.

एका दौरा करत असताना गेल्यानंतर गावात मला लोक भेटली. अनेक लोकं माझ्या जवळ येऊन माझ्या कानात सांगत होती ,बापू तुम्ही माघार घेऊ नका. यांची एवढी भीती आहे की, मी माघार घेऊ नये हे सांगण्यासाठी लोकांना कानात येऊन सांगावे लागतं आहे. या प्रस्थापित लोकांच्या विरोधात सर्वसामान्य माणूस किती पेटून उठला आहे याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार आणि लढणारच.मला जनतेचं आशीर्वाद असेल किंवा जे काही छुपं आशीर्वाद असेल ते मिळेल, असे विजय शिवतारे म्हणाले.

हे ही वाचा:

आपल्या बापजाद्यांनी केलेल्या अत्याचाराविरूद्ध या माणसानं.. Kiran Mane यांचं म्हणणं तरी काय?

आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंची बैठक,बैठकीत पाटील पाटील घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss