Thursday, May 2, 2024

Latest Posts

Mahayuti मध्ये धुसफूस कायम, Mihir Kotecha यांच्या प्रचारसभेतून शिवसैनिकांनाच सभात्याग

अद्याप महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. काही मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच चालू आहे. त्यामुळे महायुतीमधील पक्षांची धुसफूस बाहेर पडत आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली असून आजपासून (शुक्रवार, १९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. तरीही अद्याप महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाचा तिढा कायम आहे. काही मतदारसंघात शिवसेना शिंदे गट (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यात रस्सीखेच चालू आहे. त्यामुळे महायुतीमधील पक्षांची धुसफूस बाहेर पडत आहे. अश्यातच मुंबई ईशान्य मतदारसंघात (Mumbai North East Loksabha Constituency) शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात तणाव निर्माण झाला. मुंबई ईशान्य मतदारसंघातील महायुतीचे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या प्रचारसभेत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचे फोटो बॅनरवर न लावल्यामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. तसेच, प्रचारसभेचा त्याग करून आपली नाराजी व्यक्त केली.

मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी भांडुप येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale), भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) हे उपस्थित होते. या सभेदरम्यान प्रचाराचे बॅनर्स लावण्यात आले होते. पण, त्या बॅनर्समध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या फोटोंचा समावेश नसल्याने स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. भांडुप हा मराठीबहुल भाग असून येथे मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा प्रभाव पाहायला मिळतो. तरीही, मिहीर कोटेचा यांच्या या प्रचारसभेत शिवसेना नेत्यांचे फोटोज न टाकण्याची चूक झाली. त्यामुळे, शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.

शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील (Ashok Patil) आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी यांनी आक्रमक होत सभात्याग केला. आशिष शेलार यांचे भाषण चालू असतानाच माजी आमदार अशोक पाटील यांनी व्यासपीठावर जाऊन आपली नाराजी व्यक्त केली आणि शिवसैनिकांबरोबर सभात्याग केला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या नेत्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्नदेखील केलाय. परंतु, शिवसैनिकांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. महायुतीत शिवसेना – भाजपमध्ये जागावाटपावरून तणावाचे वातावरण असले तरी जमिनी स्तरावर कार्यकर्त्यांमध्येही धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde यांच्या Shivsena कडून आचारसंहिता भंग, Congress ची EC कडे तक्रार

BJP च्या भट्टीत शिवसैनिकांचा बळी, CM Eknath Shinde यांचा अभिमन्यु झालाय, Shivsena नेत्याचे गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss