कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी?

कर्नाटकमधील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंड होणार आहेत. कर्नाटका विधासभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Elections) मतदान १० तारखेला तारखेला होणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी?

कर्नाटकमधील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंड होणार आहेत. कर्नाटका विधासभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Elections) मतदान १० तारखेला तारखेला होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत परंतु कर्नाटक मध्ये कोणाची सत्ता येणार हे अवघ्या पाच दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्यामुळे काँग्रेस (Congress), भाजप (BJP) आणि जनता दल (Janata Dal) या तिन्ही पक्षांनी त्यांची ताकद प्रचारामध्ये लावली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या आधी प्री-पोल सर्वेक्षणांमध्ये असे सांगण्यात येत आहे की, काँग्रेस मोठ्या बहुमताने सत्तेत येणार आहे. तर झी न्यूज-मॅट्रिझने आपल्या जनमत सर्वेक्षणात भाजपला पुन्हा विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. तर यावेळी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आणि जनता दलाची कामगिरी सरासरीपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. ओपिनियन पोलमध्ये असेही म्हंटले आहे की, कर्नाटकमध्ये २२४ विधानसभा जागांपैकी काँग्रेस १०७ ते ११९ जागा जिंकू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. तर जेडीएसला केवळ २३ ते ३५ जागा मिळवण्याची शक्यता आहे. मतदानाच्या आधी सर्वेक्षणानुसार काँग्रेसला जवळपास ४० टक्के मत मिळू शकतात. त्याचवेळी भाजपला काँग्रेसपेक्षा पाच टक्के मतांनी पिछाडीवर दाखविण्यात आले आहे. भाजपला ३५ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी जेडीएसला १७ टक्के मते मिळू शकतात असे सांगण्यात येत आहे.

इंडिया टुडे च्या व्होटरच्या ओपिनियन पोलनेही यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव होण्याची वर्तवली जात आहे. इंडिया टुडे पोलनुसार २०१८ च्या निवडणुकीपेक्षा भाजपला २४ कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप यावेळी फक्त ७४-८६ जागा जिंकू शकेल असे सांगितले जाते. त्याचवेळी सर्वेक्षणात काँग्रेस पक्षाचे सध्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना ४२ टक्के मतांसह सर्वाधिक पसंतीचे नेते म्हणून दाखवण्यात आले आहे. भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना ३१ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे नेते म्हणून सांगितलं आहे.

हे ही वाचा : 

Majhi Tujhi Reshimgath मधील परीची आता हिंदी मालिकेत एन्ट्री 

KKRvsPBKS, कोण मारणार आजच्या सामन्यात बाजी, राणा आणि धवन आमनेसामने

‘Sanskritik Kaladarpan’ पुरस्कार सोहळा संपन्न, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version