Yashasvi Jaiswal ला IPLमधल्या कामगिरीमुळे मिळणार टीम इंडियामध्ये स्थान

आयपीएल २०२३ च्या सीझनमध्ये दमदार कामगिरी करणारा यशस्वी जैस्वाल लवकर टीम इंडियामध्ये खेळताना दिसणार आहे. लवकरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) सुरु होणार आहे.

Yashasvi Jaiswal ला IPLमधल्या कामगिरीमुळे मिळणार टीम इंडियामध्ये स्थान

आयपीएल २०२३ च्या सीझनमध्ये दमदार कामगिरी करणारा यशस्वी जैस्वाल लवकर टीम इंडियामध्ये खेळताना दिसणार आहे. लवकरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप World Test Championship) सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सरावासाठी बरेच खेळाडू लंडनला रवाना होणार आहेत. यशस्वीने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर त्याचा एक फ्लाइटमधील फोटो आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मासोबतचे फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये त्याने स्वःतच्या फोटोला कॅप्शन लिहिले आहे की “WTC”. अनेक खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी लंडनला रवाना झाले आहेत. यशस्वीच्या या फोटोने त्याने त्याच्या चाहत्यांना स्पष्ट केले आहेत की त्याला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

त्यानंतर त्याने रोहित शर्मा सोबतच्या फोटोला कॅप्शन लिहिले आहे की, “Off to England for the World Test Championship Final with the one and only @rohitsharma45 “. यशस्वीने आयपीएल २०२३ च्या या सीझनमध्ये उत्तम कामगिरी केली आणि त्याने विराम सुद्धा मोडला. यशस्वी सध्या ऑरेंज कॅपच्या लढतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने १४ सामन्यांमध्ये ६२५ धावा केल्या आहेत. त्याने या सीझनमध्ये १ शतक तर ५ अर्धशतक झळकावले आहेत. परंतु त्याला त्याच्या संघाची साथ न मिळाल्यामुळे त्याचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला.

यशस्वी जैस्वालच्या आयपीएल २०२३ ची कामगिरी पाहून सोशल इंडियावर अनेक चर्चा रंगात होत्या. यशस्वीला भारताच्या संघामध्ये स्थान मिळणार की नाही कोणते खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये खेळणार आहेत असे प्रश्न उपस्थित केले जात होते. यशस्वीच्या एका पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्याचबरोबर त्याने केलेल्या आयपीएल २०२३ च्या कामगिरीमुळे त्याचा चाहता वर्ग देखील वाढत चालला आहे.

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version