Friday, May 17, 2024

Latest Posts

Mohan Bhagwat Live : प्राणप्रतिष्ठापनेनंतर Mohan Bhagwat म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तपस्वी…

आज अयोध्येत प्रभू श्रीरामांसोबत भारताचे स्वत्व परतले असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटले. राम मंदिर (Ram Mandir) झालंय आता रामराज्यही आणावे असे आवाहनही सरसंघचालकांनी केले.

अखेर ५०० वर्षाच्या तपश्चर्येनंतर आज अयोध्येत प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी… शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्रीरामाचं अयोध्या नगरीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यांनतर अयोध्या येथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना संबोधित केले आहे. यावेळी गोविंद देव गिरी महाराज यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबोधित केले आणि त्यानंतर मोहन भागवत यांनी संबोधित केले आहे.

आज अयोध्येत प्रभू श्रीरामांसोबत भारताचे स्वत्व परतले असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटले. राम मंदिर (Ram Mandir) झालंय आता रामराज्यही आणावे असे आवाहनही सरसंघचालकांनी केले. मोहन भागवत यांनी म्हटले की, आज अयोध्येत प्रभू श्रीरामासोबत भारताचं स्वत्व परतले आहे.संपूर्ण जगाला येणाऱ्या संकटातून दिलासा देण्याचे काम भारत करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.पंतप्रधानांनी येथे अयोध्येत प्राणप्रतिष्ठापनेला येण्यापूर्वी कठोर तपश्चर्या केल्याचे आज आपण ऐकले. तपश्चर्यापेक्षा जास्त कठोर तपश्चर्या त्यांनी केली असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. “पवित्रतेसाठी संयम हवा, आपल्याला स्वत:च्या इच्छा, लोभ यापासून लांब राहिलं पाहिजे. संयम ठेवून शिस्त पाळली पाहिजे. समाजात, सामाजिक जीवनात शिस्त पाळली पाहिजे. ५०० वर्षात अनेक पिढ्यांनी बलिदान देऊन देऊन हा आनंदचा क्षण आपल्याला दिला आहे” असं भागवत म्हणाले. “मी विचार करतोय, मला इथे बसवलं, मी काय केलं हा प्रश्न मला पडतो. त्यांच्या कार्याचा प्रतिनिधी म्हणून मी इथे बसलोय. त्यांच हे व्रत आपल्याला पुढे घेऊन जायच आहे” असं मोहन भागवत म्हणाले.

“आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. आज अयोध्येत रामललासोबत भारताच स्व परतलाय. सगळ्या देशात आज आनंदाच वातावरण आहे. छोट्या-छोट्या मंदिरांच्यासमोर दूरदर्शनवर हा कार्यक्रम सुरु आहे. सर्वत्र भावनिकता आहे, सर्वत्र आनंद आणि उत्साह आहे” असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर ते बोलत होते. “पंतप्रधान मोदींनी कठोर व्रत ठेवलं, सांगितलं होतं, त्यापेक्षा कठोर व्रत त्यांनी ठेवलं. मी मोदींना पूर्वीपासून ओळखतो, ते तपस्वी आहेत. आता आपल्यालाही काही गोष्टी आचरणात आणायच्या आहेत” असं मोहन भागवत म्हणाले. “अयोध्येत रामलला परत आले, पण ते बाहेर का गेले होते? अयोध्येत कलह झाला म्हणून ते बाहेर गेले. १४ वर्ष वनवासात राहिले. ते जगाच भांडण मिटवून परत आले. आज रामलला ५०० वर्षानंतर परत आलेत. त्यांच्या तपश्चर्येमुळे आपण आज हा सोनियाचा दिवस पाहतोय. त्यांची तपस्या, त्यागाला कोटी-कोटी नमन” असं मोहन भागवत म्हणाले.

हे ही वाचा:

‘या दिवसाला सुवर्णदिन’…राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दरम्यान प्राजक्ता माळीची भावनिक पोस्ट

प्राणप्रतिष्ठापनेनंतर श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक आली समोर; रामचंद्राचं तेजस्वी रुप पाहून डोळ्यांचं पारण…

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बनवा खास तांदळाची खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss