Friday, May 17, 2024

Latest Posts

निता अंबानी यांनी घातलेला बाजूबंद हा मुघल सम्राट शाहजहान यांचा ऐतिहासिक दागिना,कोट्यावधीची किंमत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची पत्नी निता अंबानी यांना मौल्यवान दागिन्यांची भारी हौस आहे. 

जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणार तर तिचे शौक देखील तितकेच महागडे असणार यात काहीच शंका नाही.आणि स्त्रिया म्हंटलं तर दागिन्यांची हौस तर असणारचं ना! मात्र जर त्या स्त्री नीता अंबानी असतील तर मग बात ही कुछ और होगी ना !

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची पत्नी निता अंबानी यांना मौल्यवान दागिन्यांची भारी हौस आहे. नीता अंबानी  या बऱ्याचदा पारंपारिक अंदाजात दिसून येत असतात. साडी आणि दागिणे परिधान करणं त्या सर्वात जास्त पसंत करतात. नुकतेच त्यांना ७१ व्या ‘ मिस वर्ल्ड फायनलमध्ये ‘ब्युटी विथ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’ने गौरविण्यात आलं. यावेळी त्यांनी नेसलेली साडी आणि त्यावरील दागिने विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात निता अंबानी या काळ्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये दिसल्या. या साडीवरील डिझायनर ब्लाऊजवर मुगल सम्राट शाहजहांची यांची कलगी लावण्यात आली. निता यांनी या कलगीला बाजूबंदासारखं कॅरी केलं.  या कलगीची किंमत तब्बल 200 कोटींहून अधिक असल्याची म्हटलं जात आहे. या कलगीची सर्वात विशेष बाब म्हणजे हे सोन्याने बनले असून त्यात डायमंड, रूबी आणि स्पिनल्स आहे. याबद्दलची माहिती इंस्टा पेज ‘टोपोफिलिया’ दिली आहे.

या रिपोर्ट नुसार ही ‘कलगी’ शाहजहान, जहांगीरचा मुलगा आणि 1592-1666 पर्यंत राज्य करणारा पाचवा मुघल सम्राट मिर्झा शहाब-उद-दीन मुहम्मद खुर्रम यांनी परिधान केली होती. या बाजुबंदाची किंमत सुमारे २०० कोटीहून अधिक असल्याचं सांगितलं जातंय. या ऐतिहासिक दागिन्यांवर अनेक मौल्यवान हिरे, मोती यांची डिजाईन असल्याचं दिसतंय तसेच या बाजुबंदाची उंची ही १३.७ सेमी आणि रूंदी १९.८ असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

नीता आंबानी या नेहमी त्यांच्या फॅशनेबल लूकसाठी चर्चेत असतात. या सोहळ्यातील नीता अंबानींच्या चमकदार सोन्याच्या जरीपासून हाताने बनवलेल्या जंगला डिझानची बनारसी साडी आणि त्यावर असलेल्या मीनाकारी वर्कपासून ते या ऐतिहासिक दागिण्यापर्यंत सर्वांची चर्चा सगळीकडे रंगली. नुकताच अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यातील यांच्या लूकने देखील सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या सोहळ्याला बॉलीवूडसह, हॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.नीता अंबानी या वापरत असलेल्या महागड्या गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत येत असतात.

हे ही वाचा:

वसंत मोरेंनी रामराम ठोकला यावर मी काय बोलू? Sanjay Raut यांची भूमिका काय?

‘मायलेक’चित्रपटाचे टिझर प्रदर्शित,आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा चित्रपट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss