Friday, May 17, 2024

Latest Posts

आता देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्हाला Ayodhya ला जायचं?, थेट विमानसेवा होणार सुरु

अयोध्यातील राम मंदिराच्या (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी आता फक्त एक आठवडा उरला आहे .

Ayodhya Flights : अयोध्यातील राम मंदिराच्या (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी आता फक्त एक आठवडा उरला आहे . या सोहळ्याची अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. २२ जानेवारी हा दिवस प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असणार आहे. १५ जानेवारीपासूनच अयोध्यातील कार्यक्रम आणि विधींना सुरुवात होणार आहे. तसेच राम मंदिराच्या उद्घाटनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच देशातील सर्व नेते मंडळी, कलाकार देखील उपस्थित होणार आहेत. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानंतर देशभरातील लोकांना अयोध्येला जायला आवडेल. तर तुम्हाला देखील अयोध्येला जायचं असेल तर ही खुशखबर खास तुमच्यासाठी आहे.

अयोध्येला जाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जोरदार तयारी ही चालू आहे. रेल्वे विभाग देशाच्या प्रत्येक भागातून आस्था स्पेशल ट्रेन चालवत आहे. तर आता विमान कंपन्याही अयोध्येला उड्डाणाची घोषणा करत आहेत. देशाच्या विविध भागातून लोकांना अयोध्येला जाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे आणि विमान वाहतूक कंपन्यांनी मोठी तयारी केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस अयोध्या फ्लाइट आणि इंडिगो अयोध्या फ्लाइटने तेथून थेट उड्डाणे सुरू करण्याचे आधीच जाहीर केले आहे. आता स्पाईसजेट अयोध्या फ्लाइटने अयोध्येहून मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

मागच्या आठवड्यातच स्पाइसजेटने परतीच्या विमानासह दिल्ली ते अयोध्या थेट विमानसेवा जाहीर केली होती. दिल्ली ते अयोध्या हे विमान दीड तासात जाणार आहे. दिल्लीहून हे विशेष विमान (दिल्ली ते अयोध्या डायरेक्ट फ्लाइट टाइम टेबल) २१ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुपारी ३ वाजता अयोध्येला पोहोचेल. विशेष विमान अयोध्येहून २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता निघेल (अयोध्या-दिल्ली थेट फ्लाइट टाइम टेबल) आणि संध्याकाळी ६.३० वाजता दिल्लीत उतरेल. तर स्पाइसजेटने जारी केलेल्या निवेदनानुसार १ फेब्रुवारी २०२४ पासून या मार्गांवर थेट उड्डाणे उपलब्ध होतील. या मार्गांवर १८९ आसनी बोइंग ७३७ विमाने बसवण्यात येणार आहेत. यासोबतच, कंपनीने संकेत दिले आहेत की ते लवकरच अयोध्येपासून देशातील इतर काही शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करू शकते.

हे ही वाचा:

स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईत ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबविणार – CM EKNATH SHINDE

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss