Saturday, May 4, 2024

Latest Posts

उन्हाळ्यात कोंड्याने वैतागलात? मग ‘हा’ उपाय नक्की करा

उन्हाळयात त्वचा खूप टॅन होते. केसांमध्ये पण कोंडा आणि घाम चिकटतो.उन्हात त्वचेची आणि केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. रासायनिक पदार्थांमुळे त्वचेचे आणि केसांचे नुकसान होते. बाजारातले प्रॉडक्ट घेण्यासाठी खूप महाग पडते. त्यामुळे घरच्या घरी या समस्यांना वर उपाय केले पाहिजेत. ताक उन्हाळ्यात सर्वजण पितात. ताक पिल्यावर त्वचेवर चांगले परिणाम होतात. पण त्याचा वापर त्वचेवरचा टॅन घालवण्यासाठी, केसांचा कोंडा,चेहऱ्यावर चमक आण्यासाठी करू शकता. चला तर जाणून घेऊयात कसा करायचा ताकाचा वापर.

  • . ताक आणि बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑइल, याचे मिश्रण तयार करा. त्यांनतर त्यामध्ये गुलाब पाणी टाका. कॉटनच्या कापसाने किंवा फडक्याने चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटाने कोमट पाण्याने धुऊन टाका.
  • एका मिक्सरच्या भांड्यात ताक, मध आणि कोरफडचा गर टाकून बारीक पेस्ट करून घ्या. यांनतर त्या मिश्रणात गुलाब पाणी टाका. थोडावेळ चेहऱ्यावर चांगला मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाका.
  •  एका भांड्यात बेसन, ताक, काकडीचा रस मिक्स करून गुळगुळीत पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट त्वचेवर लावा. पेस्ट चांगली कोरडी होईपर्यंत ठेवा. १५ मिनिटे झाल्यांनतर धुऊन टाका.
  • ताकामध्ये कढीपत्ता,अंडी, केळी एकत्र मिक्स करा. सर्व केसांना लावा. नंतर ३० मिनिटांनी केस कोमट पाण्याने धुऊन टाका.
  • संत्र्याच्या सालीचे बारीक पावडर करून त्यामध्ये ताक टाकून चेहऱ्यावर लावा. चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुऊन टाका. यामुळे चेहऱ्यावर चांगली चमक येते.
  • केसांमध्ये कोंड्याची आणि खाजची समस्या असेल तर केस धुवतांना ताकाने टाळूवर मसाज करा. असे केल्यास केसातील कोंडा कमी होतो आणि खाज दूर होते. केस मजबूत राहतात.

हे ही वाचा:

‘या’ फळाचं लोणचं तुम्ही कधी ट्राय केलंय का?

Taarak Mehta सोडण्याबाबत ‘टप्पू’ ने केला मोठा खुलासा, लवकरच येणार Bigg Boss मध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss