Thursday, May 16, 2024

Latest Posts

Manoj Jarange सभेत बोलणार तरी काय? सोलापुरात जरांगेंची भव्य सभा

सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण रंगताना दिसून येत आहे, तर त्यात आता मराठा आरक्षणाचे प्रणेते मानले जाणारे मनोज जरांगे-पाटील हे सोलापूर मधील करमाळा तालुक्यात धडकणार आहेत. करमाळा तालुका हा माढा लोकसभा (Madha) मतदारसंघात येतो. सध्या माढाच्या तिढ्याने भाजपाची डोकेदुखी वाढली असताना म्हणून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील सरकोली येथे सकल मराठा तरुणांनी आरक्षणासाठी थांबवले होते. त्यावेळी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी कारवर भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप सुद्धा केला होता. त्यानंतर आमचं ध्येय आरक्षण असून आम्ही सर्वच पक्षांच्या नेत्यांना अडवतोय, असं मराठा आंदोलकांनी सांगितल्यावर भाजपची चिंता मिटली होती. पण आता मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे-पाटील सभेत नेमके काय बोलतात, याची धास्ती सर्वांनाच लागली आहे. मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-patil) दुपारी चार वाजता करमाळ्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या दिवेगव्हाण येथे येणार आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती आणि त्या टिकेनंतर त्यांच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Mahavikas Aghadi चा निर्णय तरी काय? Vanchit सोबत की Vanchit शिवाय?

IPL 2024 च्या लढतीत Chennai Super Kings ने मारली पहिली बाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss