Saturday, April 27, 2024

Latest Posts

IPL 2024 च्या लढतीत Chennai Super Kings ने मारली पहिली बाजी

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ (IPL 2024) च्या पर्वाला सुरुवात झाली. सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यातील लढत झाली. या लढतीमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या आरसीबीने (RCB) २० ओव्हरमध्ये सहा आउट करून १७३ धावा केल्या. त्यानंतर आरसीबी (RCB) ने दिलेले १७४ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी चेन्नई (Chennai) च्या टीमने परिश्रम घेतले. चेन्नईला राचीन रवींद्र,  अजिंक्य रहाणे यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र नेहमीच्या अंतराने विकेट पडत गेल्याने मॅच मध्ये जंगी सामना निर्माण झाला होता. चेन्नई (Chennai) ने १९ व्या ओव्हर मध्ये विजय मिळवत आरसीबी (RCB) ला पराभूत केले. चेन्नई ने यावर्षीच्या आयपीएल (IPL 2024) ची सुरुवात सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवून केली.

देशभरात आयपीएल (IPL 2024) च्या १७ व्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यातील लढतीने २०२४ आयपीएलची (IPL 2024)  सुरुवात झाली. चेन्नई (Chennai) ने पाच वेळा विजेते पद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनी (Mahendrasingh Dhoni) एमजी युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कडे नेतृत्व दिल्यामुळे या मॅचकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ने २०१९ मध्ये चेन्नई (Chennai) च्या टीममध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर फक्त चार वर्षांनी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ला चेन्नईचे नेतृत्व करण्याचे संधी मिळाली.

हे ही वाचा:

BJP आता घाबरली आहे, ठाकरे गटाच्या नेत्याचे वक्तव्य

‘केळफुलाचे काप’ आवडतात? पण करायचे कसे ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss