Saturday, May 4, 2024

Latest Posts

शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, राहुल नार्वेकरांच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

शिवसेना अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे.

शिवसेना अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असे राहुल नार्वेकर यांनी घोषित केले आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची कारण सर्व काही सेटिंग झालीये, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. या निकालानंतर आदित्य ठाकरे यांचे डोळे पाणावले होते. तसेच आता राहुल नार्वेकरांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदेंचे आमदार अपात्र नसल्याचेसुद्धा राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आणि तुरंगात जाण्यापासून वाचण्यासाठी गदारांच्या प्रमुख टोळीने हे सगळं केलं आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना यांनी गदारी केली. उद्धव ठाकरेंनी स्वतःची काळजी न घेता जनतेची काळजी घेतली. काय दिल नव्हतं म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मंत्रिपद दिले. ओळख दिली त्यांनीच फसवलं. किती काळं मन असेल या माणसाचं. ज्या माणसाला बेडवरून उठता येत नाही त्यावेळी गद्दारी केली.गोव्यात जाऊन कसे नाचले बघितला का? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.

राज्यामध्ये जी सर्कस सुरु आहे ती थांबली पाहिजे. एका मंत्री बनण्याची क्षमता पण मुख्यमंत्री बनले आहेत. आम्ही न्याय आमच्यासाठी मागत नाही तर देशासाठी मागत आहोत. महाराष्ट्र देखील देशातच आहे देशाच्या बाहेर नाही. आमच्या राज्यावर अन्याय का केला जातोय? असा प्रश्न उपस्थित करून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाने सगळीकडे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा अध्यक्षांनी निकालपत्रात शिवसेना हा पक्ष कोणाचा, यावर निर्णाय दिला. तसेच निवडणूक आयोगाकडे असलेली शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरण्यात आली आहे. २०१८ मध्ये पक्ष घटनेत झालेले बदल निवडणूक आयोगाकडे नसल्याचेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदेंची असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

MLA DISQAULIFICATION RESULTS LIVE: ऐतिहासिक निकालाच्या वाचनाला सुरुवात, कोण होणार पात्र?

जिल्हा नियोजन समिती बैठकीत ११२८ कोटी ८४ लक्षच्या आराखड्यास मान्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss