Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Teddy day2023, तुम्हाला माहित आहे का, पहिला टेडी कुठे बनवला गेला?

व्हॅलेंटाईन वीक (valentine week) ची तरुण मंडळी फार आतुरतेने वाट बघत असतात, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत कसा वेळ घालवायचा तीला कोणती भेटवस्तू द्यायची याची तयारी आधीपासूनच केली जाते.

व्हॅलेंटाईन वीक (valentine week) ची तरुण मंडळी फार आतुरतेने वाट बघत असतात, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत कसा वेळ घालवायचा तीला कोणती भेटवस्तू द्यायची याची तयारी आधीपासूनच केली जाते. या वीकमध्ये सर्व दिवस फार उत्साहाने साजरे केले जातात प्रत्येक दिवसाला विशिष्ट असे महत्व आहे तसेच आज असणाऱ्या टेडी बियर डे (teddy Day) ला सुद्धा महत्व आहे. या टेडी डे च्या दिवशी सर्व जण आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी देऊन प्रेम दर्शवतात पण हा टेडी का देतात, याची सुरुवात कशी झाली? हे कोणाला नक्कीच माहित नसेल, म्हणून आपण जाणून घेऊयात नेमक या मागच रहस्य काय?

टेडी डे साजरा करण्याची सुरुवात सर्वात प्रथम अमेरिकेत (America) झाली. मिसीसिपी आणि लुझियानातील चाललेला सीमा वाद समोर आला. यादरम्यान थेयोडोर रुझवेल्ट (Theodore Roosevelt) हे अमेरिकेचे २६ अध्यक्ष होते. रुझवेल्ट हे राजकारणी होते त्याचबरोबर त्यांना लिखाण करायचा खूप आवडत असत. मिसिसिपी (mississippi) आणि लुझियानातील (Louisiana) यातील सीमावाद मिटविण्यासाठी थेयोडोर रुझवेल्ट मिसिसिपीच्या भेटीला गेले होते. सीमा वादाची समस्या समजून घेण्या करता त्यांनी फावल्या वेळात मिसिसिपीतील जंगलाला भेट दिली.

जंगलात पडताळणी करत असताना त्यांनी एका जखमी अस्वलाला झाडाला बांधलेले पाहिले आणि खरेच त्या वेळी अस्वलाला (panda) कोणीतरी बांधले होते. अस्वल वेदनेने तडफडत होता. रुझवेल्टने तात्काळ अस्वलाला सोडले पण त्याला गोळी घालून मारण्याचा आदेश दिला. जेणेकरून त्याला होणाऱ्या वेदनेतून त्याला मुक्ती मिळू शकेल. अमेरिकेत या घटनेची सर्वत्र चर्चा होती. या कथेशी संबंधित एक व्यंगचित्र (caricature) एका नामांकित वर्तमानपत्रात छापले गेले. हे व्यंगचित्र व्यंगचित्रकार बेरीमन नावाच्या व्यंगचित्रकाराने बनविले होते , त्यानी बनविलेले अस्वल लोकांना खूप आवडले. नंतर अमेरिकेतील टॉय स्टोरचे मालक या चित्राला बघून इतके प्रभावित झाले की त्यांनी या अस्वलाच्या आकाराचे खेळणे बनवले. या खेळण्याचे नाव रुझवेल्ट यांचे टोपण नाव ‘टेडी’ या नावावरून ठेवण्यात आले, तेव्हापासून हे टेडी बिअर बाजारात प्रसिध्द झाले. तसेच जगतील पाहिले टेडी बिअर हे १९८४ साली इंग्लंडमधील पीटरफिल्डमध्ये (petersfield) जगातील पहिले टेडी बिअर सुरक्षित ठेवले गेले, जे अजूनही तसेच आहे.

हे ही वाचा : 

Propose Day 2023, तुम्हाला माहित आहे का, प्रपोज गुडघ्यावर बसूनच का करतात?

Valentine’s Day 2023, मुलींना प्रपोज करायचे ? तर या ट्रिक वापरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss