Friday, May 17, 2024

Latest Posts

Budget 2023, अर्थसंकल्पाकडे मुंबईतील रेल्वे प्रवासी बघतायत अपेक्षेच्या नजरेने

भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget of India) सादर होण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. या अर्थसंकल्पाकडे सामान्य जनता अपेक्षेच्या नजरेने बघते आहे. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन (Nirmala Sitharaman) या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget of India) सादर होण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. या अर्थसंकल्पाकडे सामान्य जनता अपेक्षेच्या नजरेने बघते आहे. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन (Nirmala Sitharaman) या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा मोदी सरकार त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडणार आहे. त्यामुळे निवडणुकांचा विचार करून व सामान्य जनतेचा व भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून मोदी सरकारने केले आहे. या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला बऱ्याच सवलती मिळणार हि माहिती मिळाली आहे. तसेच सामान्य माणसाच्या प्रवासाचा एकमेव मार्ग म्हणजे भारतीय रेल्वेला (Indian Railways) सरकारकडून पुढील रेल्वे प्रकल्पासाठी मोठा निधी(funds) मिळण्याची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास सुखकर होऊ शकतो.

हे ही वाचा:Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

दरवर्षी अर्थसंकल्पाच्या तरतुदी (Budget Provisions) झाल्यानंतर रेल्वे प्रकल्पाला किती वाट द्यायचा याचे निर्णय होऊन रेल्वेची पिंक पुस्तिका येईपर्यंत जुलै येतो तरीही रेल्वे प्रकल्प सुरु झाले नसतात. त्यामुळे रखडलेले प्रकल्प (Stalled projects) अवघ्या ७ महिन्यात कसे पूर्ण होणार हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला असतो. मुंबई महानगर प्रदेशातील रेल अवस्था दयनीय झाली आहे मध्य रेल ट्रान्स हार्बर, हार्बर लाईन वरील बरेच प्रकल्प रखडले आहेत. १० वर्ष झाली तरी या प्रकल्पना निधीची वाट पाहावी लागते,जी कामे सुरु असतात त्यांनाही पुरेसा निधी मिळत नसतो. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात रेल्वेला किती निधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पात एमयुटीपी प्रकल्पांसाठी ६५० कोटींचा निधी रेल्वेला दिला गेला होता. परंतु प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी अपुरा पडत होता. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटींची मागणी केली होती, पण प्रत्यक्षात ६५०ऐवजी ५७७ कोटींच्या निधीची तरतूद झाली. त्यामुळे अनेक प्रकल्पांची फक्त काहीच कामे पूर्ण झाली. हा अनुभव रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाला होता. म्हणून यंदा कोणते प्रकल्प आहे यावेळेस कोणत्या प्रकल्पासाठी किती निधी मागितला आहे , याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी (railway authorities) फारशी माहिती दिलेली नाही.

हे ही वाचा:

Budget 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पहिले भाषण, जाणून घ्या भाषणातल्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

आता लक्ष अस्लम शेख यांच्या स्टुडिओकडे वळणार, किरीट सोमय्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss