Tuesday, May 14, 2024

Latest Posts

Union Budget 2023, आज होणार देशाचा अर्थसंकल्प सादर

आज दि १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2023) संसदेत मांडणार आहेत

आज दि १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2023) संसदेत मांडणार आहेत. या अर्थ संकल्पाकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष हे लागले आहे. आज देशात देशात नक्की काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार ? सर्वसामान्यांच्या करत वाढ होणार कि त्यांना दिलासा मिळणार? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि विविध क्षेत्रांना काय मिळणार याची स्पष्टता आज दुपारपर्यंत होणार आहे. काल दि. ३१ जानेवारी रोजी, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पाचा दुसरा दिवस असून आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

हे ही वाचा: Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

गेलं वर्षभर सातत्यानं महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातून (Budget 2023) त्यांच्या खिशावर पडलेला भार काहीसा हलका होईल अशी अपेक्षा आहे. पण सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्यापुढे कोव्हीड काळात बिघडलेली अर्थव्यवस्थेची शिस्त पुन्हा रुळावर आणण्याचं आव्हान आवासून उभं आहे. जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान भारताच्या शिरपेचात आलेला असला, तरी हा क्रमांक वर जायचा असेल तर आर्थिक शिस्त पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही शिस्त पाळायची असेल, तर जनेतला आवडणाऱ्या मात्र तिजोरीवर भार टाकणाऱ्या घोषणा करणे अर्थमंत्र्यांना परवडणारे नाही. त्यामुळे २०२४ च्या निवडणूकीला जेमतेम सव्वा वर्ष उरलेलं असताना सादर होणाऱ्या आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण मतदारांना खुश करतात की आर्थिक शिस्तीचा मार्ग चोखाळतात याकडे साऱ्या देशाचे डोळे लागले आहे. सकाळी ११ वाजता सीतारमण यांचं भाषण सुरु होईल.

आर्थिक सर्वेक्षणानंतर हा अर्थसंकल्प अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जीडीपीच्या ६ टक्के ते ६.८ टक्के असा अंदाज आहे. अर्थमंत्र्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही हा अर्थसंकल्प आव्हान ठरू शकतो कारण पुढील वर्षी म्हणजेच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी त्यांचे सरकार देशाच्या आर्थिक विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल याची खात्री ते जनतेला कसे देऊ शकतात.

हे ही वाचा:

Budget 2023, अर्थसंकल्पाकडे मुंबईतील रेल्वे प्रवासी बघतायत अपेक्षेच्या नजरेने

Budget 2023, २०२३ मध्ये महागाई कमी होणार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss