Thursday, May 2, 2024

Latest Posts

गरोदरपणात Deepika Padukone ॲक्शन सीन शूट करेल?

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) लवकरच आई होणार आहे. दीपिका आणि रणवीर यांच्या घरी सप्टेंबरमध्ये चिमुकल्याच आगमन होणार आहे. ही बातमी त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. सध्या दीपिका गरोदरपणात ‘सिंघम अगेन’ (Singam Again) चित्रपटाच चित्रीकरण करत आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपट ती लेडी सिंघम या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पोलिसांच्या गणवेशात दिसली आहे. सध्या तिचा हा फोटो चांगलाच वायरल होत आहे. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. गरोदरपणात फिट कपड्यांमध्ये दिसत आहे. गरोदरपणात ती ॲक्शन शूट करणार नाही. तिच्या जागी दुसरी महिला हा सीन शूट करणार आहे. 

 

या चित्रपटात तिची लेडी सिंघमची भूमिका साकारत असून शक्ती शेट्टी हे नाव असणार आहे. रणवीर सिंग, अक्षय कुमार, अजय देवगण, करिना कपूर, जॅकी श्रॉफ हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. डोळ्यावर काळ गॉगल आणि शरीरावर पोलिंसांची खाकी गणवेश घालून तिने तिचा पोलिसांचा लुक पूर्ण केला आहे. तिच्या आजूबाजूला दिग्दर्शक आणि टीम तिच्याबरोबर काम करत आहेत. सिंघम अगेन हा सूर्यवंशी या चित्रपटाचा दुसरा भाग असणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच चित्रीकरण झाल्यानंतर काही काळासाठी ती चित्रपटातून ब्रेक घेणार आहे. मे महिन्यात तिचा ‘कल्की’ हा चित्रपट तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.  

हे ही वाचा:

मुंबईतील ‘या’ ५ ठिकाणी करा शॉपिंग, स्वस्तात मस्त! ‘सप्तपदी’ चं अनोखं रूप,

SONALI KULKARNI चं सौंदर्य खुललं…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss