Tuesday, April 30, 2024

Latest Posts

मुंबईतील ‘या’ ५ ठिकाणी करा शॉपिंग, स्वस्तात मस्त!

हवे तसे कपडे आणि ऍक्सेसरीज मिळतीलच असे नाही. आणि मिळाले तरी त्यांच्या किमती आपल्या खिशाला परवडतील असेही नसते. मग यावेळी खूप मोठा प्रश्न उभा राहतो. पण त्याच उत्तर हि अगदी सोपं आहे,ते म्हणजे स्ट्रीट शॉपिंग.

सध्याच्या फॅशनच्या युगात कपड्यांना एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. तुमच्या कपड्यांवरून तुमचे व्यक्तिमत्व कळते असेही म्हंटले जाते. परंतु, हवे तसे कपडे आणि ऍक्सेसरीज मिळतीलच असे नाही आणि मिळाले तरी त्यांच्या किमती आपल्या खिशाला परवडतील असेही नसते. मग अशावेळी खूप मोठा प्रश्न उभा राहतो. पण त्याचे उत्तर ही अगदी सोपं आहे, ते म्हणजे स्ट्रीट शॉपिंग. स्वस्तात मस्त असा हा ऑप्शन. मनाप्रमाणे कपडेही मिळतात आणि खिशाला परवडणारेही असतात. त्यात मुंबईकरांना तर वरदान म्हणून काही ठिकाणे मिळाली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्या ५ ठिकाणांबद्दल.

१. हिल रोड वांद्रे – वांद्रे येथे असणारे हिल रोड हे शॉपिंगसाठी अत्यंत सुप्रसिद्ध ठिकाण आहे. मनाप्रमाणे हवे तसे कपडे इथे मिळतील. विविध इअरिंग्स आणि ज्वेलरी आपल्याला इथे पाहायला मिळतील. वांद्रे स्टेशन पासून रिक्षा करून तुम्ही इथे पोहोचू शकता.

२. क्रॉफर्ड मार्केट – क्रॉफर्ड मार्केट हे फक्त कपड्यांसाठीच नाही तर घरगुती वस्तूंसाठी देखील प्रसिद्ध आहे. प्रचंड प्रकारचे डेकोरेटर्सने हे मार्केट भरलेले आहे. १५० वर्ष जुने असे हे मार्केट मुंबईतील फेमस मार्केट आहे.

३. लोखंडवाला मार्केट – लोखंडवाला मार्केट हे मुंबईतील फार मोठे मार्केट आहे. तुम्हाला तेथे महिला तसेच पुरुषांसाठीदेखील कपडे मिळू शकतात. खाण्याच्या पदार्थांसाठी देखील हे मार्केट प्रसिद्ध आहे.

४. चोर बाजार- घराला रिनोव्हेट करणार असाल तर चोर बाजार हा उत्तम पर्याय ठरू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेटर्स तुम्हाला इथे मिळतील. इतर मार्केटच्या तुलनेत हे जरा महाग असतील पण यांच्यासारखे प्रोडक्ट्स तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही.

५. कुलाबा कॉजवे – कुलाबामध्ये मोडणारे कुलाबा कॉजवे हे प्रसिद्ध मार्केट आहे. सर्व प्रकारचे कपडे, ऍक्सेसरीज, चप्पल तुम्हाला इथे मिळतील. याच्याशिवाय शॉपिंगसोबत स्ट्रीट फूडचा आनंद देखील घेता येईल.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss