Monday, May 20, 2024

Latest Posts

रात्री १२ नंतरही पुण्यात डीजेचा दणदणाट सुरूच

कोरोनाच्या (Corona Update) दोन वर्षाच्या कालखंडानंतर गणेश उत्सवाचा (Ganesh Utsav) पूर्णपणे आनंद घेत गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा केला.

कोरोनाच्या (Corona Update) दोन वर्षाच्या कालखंडानंतर गणेश उत्सवाचा (Ganesh Utsav) पूर्णपणे आनंद घेत गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा केला. मात्र काही ठिकाणी या उत्साहाला गालबोट लागल्याचेही पाहायला मिळाले. गेले दहा दिवस संपूर्ण राज्यभर एकच जयघोष होता. हा जयघोष आज देखील सुरु आहे. काळ सकाळ पासून विसर्जन मिरवणूक या सुरु झाल्या होत्या. व काही गणपतीच्या मिरवणुका रात्रभर सुरु होत्या. राज्यात बऱ्याच ठिकाणी रात्री १२ च्या आता विसर्जन मिरवणुका संपल्या. परंतु पुण्यात मात्र १२ नंतरही डीजे सुरु होता.

पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ गणेश मंडळ कुमठेकर रस्त्यावरून दोन तास जागेवरून हललेच नाही. त्यामुळे पाठीमागील मंडळे पुढे जाऊ शकली नाहीत. पाठीमागील मंडळांनी , पोलिसांनी आणि प्रशासनाने वारंवार विनंती करूनही पोटे यांचे मंडळ ऐकत नव्हते. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्त मंडळाचा डी जे बंद करण्यासाठी गेले. मात्र तरीही दीपक पोटे यांनी मंडळ अलका चौकात येताच महापालिकेच्या स्टेजवर जाऊन माईक स्वतः हातात घेतला आणि डी जे लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वःत महापालिकेच्या स्टेजवर गेले आणि त्यांनी डी जे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर पोटे यांचे गणेश मंडळ रात्री बारा वाजता पुण्यातील अलका चौकातून विसर्जनासाठी पुढे गेले.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुका लांबल्याने रात्री बारा वाजेपर्यंत खामगाव शहरात २८ मंडळांपैकी फक्त निम्मेच गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होऊ शकले. रात्री बारापर्यंत फक्त पंधरा गणेश मंडळांचे विसर्जन झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी उरलेल्या गणेश मंडळाचे डीजे बंद करून मिरवणूक आटोपत्या घेतल्या. उरलेल्या गणेश मंडळ यांचे रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जन झाले. खामगाव शहरात २८ गणेश उत्सव मंडळाचे गणपती रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जित झाले. लांबलेल्या मिरवणुका यावेळी गणेश विसर्जन उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं. जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडलं.

आज देखील काही ठिकाणी बाप्पाला निरोप दिला जात आहे. काल सकाळपासून सुरु झालेला विसर्जन सोहळा रात्री उशीरापर्यंत सुरु होता. मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी गणपती विसर्जित झाले. तर काही गणपतीच्या मिरवणुका रात्रभर सुरु होत्या, ज्या सकाळी विसर्जित झाल्या. राज्यात बऱ्याच ठिकाणी रात्री १२ च्या आता विसर्जन मिरवणुका संपल्या. मात्र काही ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत रात्री १२ वाजेनंतरही डीजेच्या दणदणाटासह मिरवणुका सुरु होत्या. कोल्हापूर, नाशिक, साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजता डीजेचा दणदणाट बंद करण्यात आला. तर पुण्यात १२ नंतरही डीजे सुरु होता. मुंबई शांततेत विसर्जन मिरवणुका पार पडल्या. ८० टक्के पोलिस फोर्स गणेश विसर्जनासाठी रस्त्यावर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

हे ही वाचा:

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी केले हात साफ, तब्ब्ल ५० फोन अन् दागिन्यांची चोरी!

Pitru paksha 2022 : आजपासून सुरु होणाऱ्या पितृपाक्षाविषयी शंका आहेत ? तर मग करा शंकाचे निरसन…

पुढच्या वर्षी लवकर या… मुंबईतील लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss