Thursday, May 9, 2024

Latest Posts

Ganesh Chaturthi 2023 , गणपती बाप्पाला दुर्वा का प्रिय आहे?, जाणून घ्याकाही खास गोष्टी

हिंदू धर्मात गणपती आराध्य दैवत आहे. मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ पासून देशभरात गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.

Ganesh Chaturthi 2023 : हिंदू धर्मात गणपती आराध्य दैवत आहे. मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ पासून देशभरात गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पुढील १०दिवस गणेशोत्सवातील वातावरण गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. गणेशाच्या पूजेमध्ये मोदक आणि दुर्वा अर्पण करणे याला विशेष महत्त्व आहे. दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की, दुर्वा अर्पण केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती वाढते. दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच, त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळतो. त्यामुळे आयुर्वेदातही याला मोठं महत्त्व आहे. जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

बाप्पाला दुर्वा का प्रिय आहेत? –

गणपतीला दुर्वा आवडतात आणि त्यांची कोणतीही उपासना ही दुर्वाशिवाय अपूर्ण मानली जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की श्रीगणेशाला दुर्वा इतके का आवडतात आणि त्यांना दुर्वा का अर्पण केल्या जातात? खरंतर त्यामागे एक पौराणिक कथा आहे. यानुसार अनलासुर नावाचा राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्ग दोन्हीमध्ये दहशत निर्माण केली होती. अनलासुराच्या दहशतीने भयभीत झालेले ऋषी, आणि देवसुद्धा भीतीपोटी रडत भगवान शंकराकडे आले आणि त्यांना आपली दुर्दशा सांगितली, तसेच अनलासुरपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली.

भगवान शंकर म्हणाले की, अनलासुराचा वध फक्त श्री गणेशच करू शकतो. नंतर तेच झाले आणि श्री गणेशाने अनलासुर गिळला. असे केल्याने श्री गणेशाच्या पोटात तीव्र जळजळ होऊ लागली. त्यांच्या पोटातील जळजळ कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. पण दिलासा मिळाला नाही. त्यानंतर ऋषी कश्यप यांनी दुर्वाच्या 21 जुड्या बनवून श्री गणेशाला खाऊ घातल्या आणि दुर्वा प्राशन करताच त्यांच्या पोटातील जळजळ कमी झाली. तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा प्रिय आहे. गणेशोत्सवादरम्यान दुर्वा अर्पण करूनही तुम्ही गणपतीचा आशीर्वाद घेऊ शकता.

दुर्वा कशी अर्पण करावी?

गणपतीला विशिष्ट पद्धतीने दुर्वा अर्पण केल्या जातात. २२ दुर्वा एकत्र करून ११ जोड्या तयार केल्या जातात. ११ जुड्या श्रीगणेशाच्या चरणी अर्पण करावेत. पूजेसाठी मंदिराच्या बागेत किंवा स्वच्छ ठिकाणी उगवलेली दुर्वाच घ्यावी. दुर्वा अर्पण करण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवावी.

गणपतीला दुर्वा अर्पण करण्याचे नियम –

गणपतीला दुर्वा अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवा.
लक्षात ठेवा की दुर्वा मंदिरात, बागेत किंवा स्वच्छ ठिकाणी वाढवावी.
ज्या ठिकाणी घाण पाणी येते त्या ठिकाणच्या गणपतीला दुर्वा अर्पण करू नका.
नेहमी दुर्वाची जोडी बनवून देवाला पूजेत अर्पण करावी.
गणपतीला 21 दुर्वाच्या जोड्या अर्पण कराव्यात.
दुर्वा अर्पण करताना गणेशाच्या मंत्रांचा जप करावा.

दुर्वा अर्पण करताना गणपतीच्या ११ मंत्रांचा जप करावा. ते मंत्र आहेत –

ओम गं गणपतये नमः
ओम गणाधिपाय नमः
ओम उमापुत्राय नमः
ओम विघ्ननाशनाय नमः
ओम विनायकाय नमः
ओम इशपुत्रय नमः
ओम सर्वसिद्धिप्रदाय नमः
ओम सर्वसिद्धिप्रदाय नमः
ओम इभवक्ताय नमः
ओम मुषकवाहनाय नमः
ओम कुमारगुर्वे नमः।

Latest Posts

Don't Miss