spot_img
spot_img

Latest Posts

गणेश चतुर्थी नेमकी १८ सप्टेंबरला आहे की १९ सप्टेंबरला ? जाणुन घ्या

गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण गणेशोत्सवासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.

गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण गणेशोत्सवासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. पण यावर्षी गणपतीच्या तारखेवरुन गोंधळ दिसून येत आहे. यावर्षी गणेश चतुर्थी सप्टेंबर महिन्यात असून महिन्याच्या सुरुवातीपासून बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र आता अनेकांचा संभ्रम हा आहे की, गणेश चतुर्थी ही नेमकी कोणत्या तारखेला आहे? तुमचा ही गणेश चतुर्थीच्या तारखेत गोंधळ झाला असेल, तर मग जाणून घेऊया गणेश चतुर्थी नेमकी कधी आहे ते.

गणेश चतुर्थी ही 18 सप्टेंबर या तारखेस आहे. गणेश चतुर्थी ही 19 सप्टेंबर रोजी नसून 18 सप्टेंबर या तारखेस आहे याची कृपया सर्व श्रद्धावान गणेश भक्तांनी नोंद घ्यावी. १८ सप्टेंबर चतुर्थीच्या दिवशी सूर्योदय ते दुपारी २ पर्यंत तुम्ही केव्हाही गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. सूर्योदय ते दुपारी २ पर्यंत प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आहे.

दरवर्षी गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर लोक पुढील वर्षी बाप्पाचे आमगन कधी होणार याची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी सुद्धा बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असून सर्वत्र खूप उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण दिसून. ठिकठिकाणी मंडप आणि सजावटीची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

हे ही वाचा: 

गणपतीच्या प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा

भाद्रपद महिन्यातील पिठोरी अमावस्येचे महत्व तुम्हला माहित आहे का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss