spot_img
spot_img

Latest Posts

गणेशोत्सवाचा इतिहास आणि संस्कृती जाणून घ्या

घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा गणपती बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन जाते. गणपती बाप्पाच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन गणपतीची तयारी ही सुरू होते.

घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा गणपती बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन जाते. गणपती बाप्पाच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन गणपतीची तयारी ही सुरू होते. प्रत्येक जण आपल्या आपल्या पंरपरेप्रमाणे गणपती बाप्पाची पुजा अर्चना करतात. कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे तर अगदी एक दिवसाकरीता देखील येतो. तर दरवर्षी येणाऱ्या आपल्या गणेशोत्सवाबद्दल आपण माहिती जाणुन घेऊया.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भारतीयांना एकत्र आणण्याकरीता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याकरीता गणेशोत्सव उत्सवाची सुरूवात केली होती. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि विविध स्पर्धाचे आयोजन देखील करण्यात येते. १८९४ साली विंचूकर वाड्यात लोकमान्य टिळकांनी पहिल्या गणेशोत्सवाची सुरुवात केली होती आणि मंदार लवटे यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात १८९३ ला केली होती. ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी गणेशोउत्सवाची सुरुवात केली. आपल्या देशामध्ये असलेली देशप्रेमाची भावना वाढण्यासाठी आणि त्याचबरोबर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. लोकमान्य टिळकांच्या काळात गणेशोत्सवाला परदेशात ही महत्व प्राप्त झाले.

प्राचीन काळातील आर्य-आर्येतर देवता, बौद्धमतवाद आणि चिनी यात्रेकरूंच्या माध्यमातून गणपतीचा परदेशातील प्रवास या गोष्टी घडल्या आहेत. सवाई माधवरावांच्या आयुष्यातील ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या घडल्या, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सव. पेशव्यांनी या घरगुती गणेशोत्सवाला मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जात होता. पेशवांच्या दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. पेशव्यांचे विश्वासू पटवर्धन, दीक्षित आणि मुजुमदार यांनी या उत्सवामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. शनिवारवाड्यातून दशमीला सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेलाच असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले.

हे ही वाचा: 

यंदा आपल्या लाडक्या बाप्पासाठी बनवा मुगाच्या डाळीचे चविष्ट मोदक

हरतालिकेच्या पूजेचं महत्व, मुहूर्त आणि पूजा कशी करायची? जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss