spot_img
spot_img

Latest Posts

परदेशात राहणाऱ्या लोकांनी गणपती कोणत्या तारखेला बसवावा? जाणुन घ्या

गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत. त्याच्या आगमनाची तयारी कितीतरी दिवस आधीपासून सुरू होते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपल आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळतो.

गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत. त्याच्या आगमनाची तयारी कितीतरी दिवस आधीपासून सुरू होते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपल आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळतो. भक्त आतुरतेने बाप्पाच्या आगमनाची वाट बघत असतात. बाप्पाच्या आगमनासाठी भारतातील अनेक शहरांत खूप जोरदार तयारी १देखील सुरु झाली आहे. मात्रा बाप्पाचे काही भक्त भारताबाहेर सुद्धा राहतात. अशा वेळी परदेशातील आणि भारताची वेळ ही वेगवेगळी असल्याने त्यांनी नेमकी बाप्पाची स्थापन कधी करावी असा मोठा प्रश्न पडतो. तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक परदेशात राहत असतील आणि त्यांना हाच प्रश्न पडला असेल तर ही माहिती जाणुन घ्या.

संपूर्ण अमेरिका खंडामध्ये आणि युरोप खंडामध्ये जसे कि, लॉस एंजेलिस, वॉशिंगटन, न्यूयॉर्क, शिकागो, लंडन, वॉरसॉर, रोम, जिनेव्हा, सेंट पिटर्सबर्ग आणि मॉस्को यांसारख्या रशियातील शहरांत त्याचबरोबर अबुडाबी, कराची, सिंगापूर, जकार्ता आणि संपूर्ण भारत देशात १८ सप्टेंबर रोजी गणपती बसवण्यात येईल. त्याचबरोबर फिलीपाइन्समध्ये, अँटी पोलो, हाँगकाँग, संपूर्ण जपान देश आणि ऑस्ट्रेलियामध्ये १९ सप्टेंबर रोजी गणपतीची स्थापना सूर्योदयापासून ते दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत करावी. गणपती बाप्पाची पूजा विधीवत केल्याने तुम्हाला त्याचे शुभ फळ नक्की मिळेल. गणेशाची बाप्पाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर, फुलं आणि दुर्वा अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे.

ज्योतिष आणि शास्त्रात ज्याचा शब्द प्रमाण मानला जातो, असे काशीचे प्रकांड पंडित श्री गणेशशास्त्री द्रविड गुरुजी व धरवाडीचे पंडित राजेश्वर शास्त्री उप्पिनबेट्टिगिरी याच्या मार्गदर्शनानूसार. तसेच भारतातील तमाम सनातन सूर्यसिद्धांत पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही 19 सप्टेंबर रोजी नसून 18 सप्टेंबर या तारखेला आहे. याची कृपया सर्व गणेश भक्तांनी नोंद घ्यावी.

हे ही वाचा: 

हरतालिकेच्या पूजेचं महत्व, मुहूर्त आणि पूजा कशी करायची? जाणून घ्या

बैलपोळा सण का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss