Monday, May 20, 2024

Latest Posts

समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था सरसावल्या, अमित ठाकरे सह सेलेब्रिटींनीही घेतला पुढाकार

गणपती विसर्जनानंतर आज (शनिवारी) सकाळी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सरसावले आहेत.

गणपती विसर्जनानंतर आज (शनिवारी) सकाळी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सरसावले आहेत. दिव्याज फाउंडेशनच्यावतीने गणेश विसर्जनानंतर जुहू येथे किनारा स्वच्छ अभियान राबवले गेले. या मोहिमेत राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यासह भाजप नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनीदेखील दादर चौपाटीवर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी मनसे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

गणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष पुढे येताना दिसत आहेत. दिव्याज फाउंडेशनच्यावतीने गणेश विसर्जनानंतर जुहू बिच स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस , अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यासह विविध भाजप नेत्यानी उपस्थिती दर्शवत जुहू बीच स्वच्छतेची मोहिम हाती घेतली. या वेळी बोलताना अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले की, मुंबई अनेकांना खूप देते. मलाही या शहराने खूप काही दिले आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी गेल्या दोन वर्षांत चांगलं काम केलं आहे. आता आपल्याला मुंबई स्वच्छ करायची असल्याचे खेर यांनी म्हटले. मुंबई स्वच्छ करायची असून त्यात सर्वांनी आनंदाने सहभागी व्हावे असे आवाहन परिणीती चोप्राने केले. अमृता फडणवीस यांनी म्हटले की, जेथे स्वच्छता असते तिथे देव असतो. आजच्या या स्वच्छता मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर सगळेजण जमले आहेत, याचा आनंद वाटत आहे. आपण सगळेजण स्वच्छता मोहिमेत यशस्वी होऊ असेही त्यांनी म्हटले.

तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सहभाग घेतला. अनेक पर्यावरणप्रेमींसह अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला. “आपला समुद्रकिनारा आपली जबाबदारी” असे म्हणत वर्सोवा विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली सात बंगला – वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मनसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवत मोठ्या प्रमाणात समुद्रात किनाऱ्यावर वाहून आलेले निर्माल्य आणि इतर कचरा गोळा केला. यावेळी सफाई मोहिमेत मनसैनिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला. या मोहिमेचे काही फोटो मनसेने ट्विट केले आहेत.

याप्रसंगी त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण-तरुणीसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

हे ही वाचा:

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी केले हात साफ, तब्ब्ल ५० फोन अन् दागिन्यांची चोरी!

Pitru paksha 2022 : आजपासून सुरु होणाऱ्या पितृपाक्षाविषयी शंका आहेत ? तर मग करा शंकाचे निरसन…

लालबागच्या राजाचे शेवटचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची तुफान गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss