Tuesday, May 7, 2024

Latest Posts

Fodnichi Kairi Recipe, यंदा उन्हाळ्यात घ्या ‘फोडणीची कैरी’ चा आस्वाद

मार्च महिना संपून आता एप्रिल महिना हा चालू झाला आहे. उन्हाळा हळू झाला कि सर्वाना कैरी , आंबे खाण्याचे वेध लागतात.

मार्च महिना संपून आता एप्रिल महिना हा चालू झाला आहे. उन्हाळा हळू झाला कि सर्वाना कैरी , आंबे खाण्याचे वेध लागतात. अर्थात कैरी हे असं फळ आहे ज्याला कोणी नाही म्हणूच शकत नाही. उन्हाळयातच येणाऱ्या कैरीच्या आशेने सर्वजण दरवर्षी या सीझनची वाट पाहत असतात. रसरशीत आंबट – गोड कैरीवर मीठ, मसाला, चाट मसाला वैगरे भुरभुरून खाण्याचे सुख काही वेगळेच असते. तसेच कैरीचे लॉन्च , पन्ह.. असे अनेक पदार्थ देखील आपण बनतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फोडणीची कैरी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :-

मोहरी – १ टेबलस्पून
जिरे – १ टेबलस्पून
हिंग – १/२ टेबलस्पून
लसूण पाकळ्या – ५ ते ६ (बारीक चिरलेला)
कढीपत्ता – ७ ते ८ पान
हळद – १ टेबलस्पून
लाल तिखट मिरची पावडर – १ टेबलस्पून
गुळ – २ टेबलस्पून (किसून बारीक केलेला)
मीठ – १ टेबलस्पून
तेल – २ ते ३ टेबलस्पून

कृती :-

सर्वप्रथम कैरीचा देठ मोडून घ्या आणि तिथून येणारा चीक नीट काढून घ्यावा. त्यानंतर त्या सर्व कैऱ्या स्वच्छ पाण्यांत धुवून घ्याव्यात. आता फोडणीची कैरी बनवण्यासाठी आपल्याला सर्व कैऱ्या या मध्यम आकारात कापून घ्या. त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि त्या कढईत थोडेसे तेल, मोहोरी, जिरे, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, हिंग, लाल तिखट मिरची पावडर, हळद हे सर्व पदार्थ टाका आणि सर्व एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यात किसलेला गूळ हा टाका.आणि तो गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत तुम्ही त्याला ढवळत राहा. जेणेकरून गुळाच्या गठुळ्या तयार होणार नाही.

गूळ संपूर्ण वितळून सर्व पदरात एकजीव झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी घाला. आणि चवीनुसार मीठ देखील घालावे. आता सर्व सर्व मिश्रण व्यवथित एकजीव करून घ्या. साधारतः ५ ते ७ मिनिटानंतर गॅस बंद करा. तयार झालेली फोडणीची कैरी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. अशापद्धतीने आपली फोडणीची कैरी खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा : 

IPL 2023, ३१ मार्च रोजी होणार आयपीएल उद्घाटन सोहळा

छ. संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss