Thursday, May 9, 2024

Latest Posts

‘केळफुलाचे काप’ आवडतात? पण करायचे कसे ?

सर्वांनाच केळफुलाची भाजी कशी बनवतात हे माहिती असेल. पण तुम्ही कधी केळफुलाचे काप खाल्ले आहेत का? केळफुलाची भाजी ही जास्त कोकणात केली जाते. ही भाजी चवीला खूप चविष्ट असते. केळफुलाची भाजी आरोग्याला पण खूप उत्तम असते. ह्या भाजीमध्ये चांगले जीवनसत्त्व असतात. आपल्या रोजच्या जेवणात भाजी बनवतात तशीच केळफुलाची भाजीबनवली जाते. पण रोज-रोज भाजी खाऊन खूप कंटाळा येतो. म्हणून आज एक तुम्हाला नवीन अशी एक रेसिपी सांगणार आहोत.ही रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल. आणि या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपल्या घरातच उपलब्ध असते.

केळफुलाचे काप करण्यासाठी लागणारे साहित्य: 

१. केळफुल
२. आलं लसुण पेस्ट
३. लाल तिखट
४. मीठ
५. तेल
६. कोकमचे आगळ
७. रवा

केळफुलाच्या कापाची कृती: 

सर्वप्रथम एक केळफुल घ्या. केळफुलाचे काप करून घ्याचे मग ते काप पाण्याने धुऊन घ्या. मग त्या कापांवरती कोकम आगळ, लाल तिखट, आलं लसुण पेस्ट, मीठ लावून घ्या. नंतर एका ताटामध्ये रवा आणि लाल तिखट एकत्र मिसळून घ्या. ते काप मग त्या रव्यामध्ये घोळून घ्या. नंतर गॅस वर तवा गरम करत ठेवा. मग तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल टाका. मग तेल हलकं गरम झाल्यावर ते काप त्यावर ठेवा. खरपूस लाल होईपर्यंत काप फ्राय करून घ्या. मग काय तयार आहेत गरमागरम असे कुरकुरीत केळफुलाचे काप.

टीप: 

केळफुल हे नाजूक असल्यामुळे ते लवकर शिजवून तयार होतात.

हे ही वाचा:

देशात पहिली निवडणूक कधी पार पडली? कोणत्या राज्यात झाले पहिले मतदान, जाणून घ्या सविस्तर माहिती

महाविकास आघडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग, हिंदू बंधू-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? एकनाथ शिंदेनी साधला ठाकरेंवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss