Saturday, June 3, 2023

Latest Posts

कोकण स्पेशल चमचमीत फणसाची भाजीची रेसिपी घ्या जाणून

फणस म्हंटलं कि डोळ्यासमोर येत ते म्हणजे कोकण. कोकण हे निसर्ग, आंबे, समुद्र यासोबतच फणस यामुळे सुद्धा प्रसिद्ध आहे.

फणस म्हंटलं कि डोळ्यासमोर येत ते म्हणजे कोकण. कोकण हे निसर्ग, आंबे, समुद्र यासोबतच फणस यामुळे सुद्धा प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात कोकणात अनेक प्रकारचे खाण्याचे पदार्थ बनवले जातात. तर उन्हाळ्यात कोकणात बनवली जाणारी अशीच एक चमचमीत मेजवानी म्हणजे फणसाची भाजी. फणसाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. ही फणसाची भाजी उपवासालाही चालते. ही भाजी प्रामुख्याने दोन पद्धतीने केली जाते एक म्हणजे कच्च्या फणसाची आणि दुसरी म्हणजे अर्ध्या कच्च्या फणसाच्या गऱ्याची . फणसाचे गारे काप करून त्यांना वाळवून तुम्ही हे वर्षभर साठवून कधीही वर्षभरात तुम्ही हे चमचमीत भाजी खाऊ शकता. चला तर मग ह्या चमचमीत भाजीची रेसिपी जाणून घेऊया.

फणसाच्या भाजीचे साहित्य :

अर्धवट पिकलेला फणस ३/४ कप भिजवलेले पावट्याचे दाणे (कुकरमधे शिजवलेले) ४ चमचे टेल १/४ चमचे मोहरी १/४ चमचे जिरे हिंग हळद ४ सुक्या लाल मिरच्या चवीनुसार मीठ.

फणसाची भाजी बनवण्याची कृती:

  • सर्वप्रथम हाताला व विळीला तेल लावून फणस चिरून घ्यावा.
  • फणस मधोमध आडवा चिरून घ्यावा व बाहेर आलेला चीक लगेच पुसून घ्यावा. चिरलेल्या अर्ध्या भागाचे ४ भाग करावे. आतील गऱ्यांवर असलेली चिवट पट्टी हि साल काढण्यापूर्वी काढून घ्यावी.
  • स्लॅकडचा भाग हा विळीवर काढून घ्यावा व सोललेला तुकडा हा पाण्यात बुडवून ठेऊन द्यायचा तसे केल्याने तो कला पडणार नाही.
  • सोललेल्या फणसाचे लहान तुकडे करून ते कुकर मध्ये टाकावेत. तुकडे पूर्ण पाण्यात मावतील इथपर्यंत पाणी घ्यावे.
  • त्यात चवीनुसार मीठ घालून कुकरच्या ३ शिट्या करून फणसाचे तुकडे मऊ शिजवून घ्यायचे.
  • कढईत तेल गरम करून त्यात जिरा, मोहरी ,हिंग, हळद, आणि सुक्या मिरच्या घालून फोडणी द्यायची.
  • त्यात शिजवलेला फणस व शिजवलेले शेंगदाणे घालून फोडणीत टाकावे. हवे असल्यास त्यात थोडे पाणी आणि तिखट टाकावे.
  • गूळ व मीठ घालून ५ ते ६ मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. तर अशाप्रकारे तुम्ही चमचमीत फणसाच्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

Latest Posts

Don't Miss