Sunday, May 28, 2023

Latest Posts

राशिभविष्य, २२ मे २०२३, आज कौटुंबिक सौख्याचा आस्वाद…

आजच्या दिवशी पराक्रमातून लाभाची प्राप्ती कराल. कोणत्याही परिस्थितीत आपला तोल ढळू देऊ नका.

माझी रास

मेष – आजच्या दिवशी पराक्रमातून लाभाची प्राप्ती कराल. कोणत्याही परिस्थितीत आपला तोल ढळू देऊ नका.आपल्यातील क्षमतांचा योग्य वापर करून आज आपले कार्य सिद्ध कराल.

वृषभ – आज कौटुंबिक सौख्याचा आस्वाद घ्याल.कुटुंबियांच्या मर्जीने,इच्छेने आज वागाल.आज आपल्या आवडीनिवडीतून धनप्राप्ती कराल.

मिथुन – आजचा दिवस नाविन्यपूर्ण ऊर्जा व अभूतपूर्व उत्साह यांनी भरलेला असेल.आजच्या सुंदर दिवसाचा योग्य उपयोग करून घ्या.

कर्क – आजचा दिवस काहीसा तणावयुक्त, चिंताग्रस्त जाईल. आपल्या मेहनतीच्या मानाने नशीबाची साथ आज मिळणार नाही.विनाकारण कोणाशीही वादविवाद,कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्या.

सिंह – आज अनेक दिवसांपासूनची तपश्चर्या कामी येईल. आज लाभाची,आनंदाची प्राप्ती होईल.मात्र मिळालेलं योग्य पद्धतीने जपता आले पाहिजे.

कन्या – आज मेहनत,परिश्रम, कष्ट करून कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहाल.आज आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर राहिलं.

तुळ – आजच्या दिवशी भाग्याची, नशीबाची साथ मिळेल. आज गुरुजन, पूजनीय व्यक्तींचा सहवास लाभेल.काही प्रवास संभवतात.

वृश्चिक – आजच्या दिवशी अनेक अडचणी, अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणाशीही वादविवाद, कटकटी यांसारखे प्रसंग टाळा.

धनु – आज वैवाहिक जीवनात दोघांमधील सख्य वाढेल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. व्यवसायात काही नवीन संधी उपलब्ध होतील.

मकर – आज काहीशी मानसिक, शारीरिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या समस्या सतावतील.काही स्पर्धक, हितशत्रू डोके वर काढतील.

कुंभ – आजचा आपला दिवस उत्साहाने व्यतित कराल. संततीकडे लक्ष द्याल. संततीसोबत अमूल्य वेळ घालवाल. आजचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल.

मीन – आजच्या दिवशी घरात रममाण व्हाल. घरच्यांसाठी वेळ काढाल. घरातील खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज पूर्ण कराल. काही खरेदीही कराल.

Latest Posts

Don't Miss