Monday, May 6, 2024

Latest Posts

Naresh Mhaske Exclusive: Thane, Nashik मधून Shivsena च लढणार

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) दुसरा टप्पा देशभरात पार पडत आहे तरी अद्याप ठाणे लोकसभा मतदारसंघातील (Thane Loksabha Constituency) महायुतीचा (Mahayuti) जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर टाइम महाराष्ट्राचे (Time Mahrashtra) संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांनी शिवसेना (Shivsena) नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांची एक्सक्लूजीव मुलाखत घेतली. यावेळी बोलताना नरेश म्हस्के यांनी ‘ठाण्याची आणि नाशिकची जागा शिवसेनेचाच उमेदवार लढवणार’ असे वक्तव्य केले आहे.

ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नाही. त्यामुळे महायुतीमधील लहान भाऊ असलेल्या शिवसेनेचे सगळे निर्णय भाजप घेत आहे का? या प्रश्नावर बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संभाजीनगर येथील सभेत बोलताना ठाणे आणि नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार हे स्पष्ट केले. प्रत्येक कार्यकर्त्याची हि इच्छा असते कि प्रत्येक जागा आपण लढवावी पण प्रमुख नेते बसून हे ठरवतील. कित्येक वर्ष ठाण्याची जागा शिवसेनेने लढवली आहे, नाशिकच्या जागेवर मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे मुख्य नेते योग्य तो निर्णय घेतील. छोट्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडिया पोस्ट टाकणे, वादविवाद घालणे हे सोपे आहे. पण एकदाचा निर्णय झाला तर सगळे कार्यकर्ते एकत्र येतील. अद्याप या जागा कोण लढवणार याचा निर्णय झालेला नाहीये तरीसुद्धा ठाण्यातील चारही विधानसभांमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांच्या एकत्र सभा झाल्या आहेत.”

ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे निवडणूक लढवण्यासाठी नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), विधानपरिषद माजी सदस्य रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांचे नाव पुढे येत आहे. आता, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांचेही नाव पुढे येत आहे. यापैकी उमेदवारीचा टिळा कोणाच्या भाळी लागणार? असा प्रश्न केला असता म्हस्के म्हणाले, “आमच्यामधे इच्छूक नावाचा काही प्रकार नाहीये. पक्षाचे मुख्य नेते याबाबतीत योग्य तो निर्णय घेतील. माझ्या दृष्टीने वैयक्तिक उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही काम करत नसून महायुतीसाठी सर्व एकत्र येऊन काम करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा आणि ठाण्यातील जागा सर्वाधिक मतांधिक्क्याने निवडून आणण्याचा जो शब्द दिला आहे तो पूर्ण करण्याचे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. उमेदवारी आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.”

हे ही वाचा:

Naresh Mhaske Exclusive: बहिणीच्या जागी उभे राहिलात आणि त्यांना दुसरीकडे पाठवता, Pankaja Munde यांना टोला

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss