Friday, April 26, 2024

Latest Posts

राशिभविषय, १४ मे २०२३, आज आपल्या कामधंद्याचे नियोजन…

आपल्या मुळच्या धडाकेबाज स्वभावाला व सतत कृतीशील वृत्तीला अनुसरून आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ करण्याचा प्रयत्न करा.

माझी रास

मेष
आपल्या मुळच्या धडाकेबाज स्वभावाला व सतत कृतीशील वृत्तीला अनुसरून आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ करण्याचा प्रयत्न करा. आपण पटकन समोरच्याला काहीतरी बोलून जातो, आज आपल्या बोलण्यावर ताबा ठेवणे आवश्यक.

वृषभ
आज आपल्या कामधंद्याचे नियोजन करण्याबरोबरच पारिवारिक सुखाचाही आनंद घ्याल. कुटुंबासमवेत त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कराल. प्रसंगी एखाद्या शुभकार्यात वा धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

मिथुन
आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय सुंदर व महत्त्वाचा राहीलं. आपण नाविन्यपूर्ण गोष्टींचे भोक्ते असल्याने आज काहीतरी नवीन गोष्टी करण्याकडे आपला कल राहीलं. वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार यांच्यावर विनाकारण चिडचिड करू नका.

कर्क
आपला मूळ स्वभाव संवेदनशील व हळवा आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता राहीलं. त्यामुळे लक्ष विचलित न होऊ देता आपले नित्यकर्म करीत राहा. वादविवाद, कटकटीचे प्रसंग टाळा. अन्यथा पश्चातापाची वेळ येऊ शकते.

सिंह
आपला मूळ स्वभाव सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा आहे. त्यानुसार आज आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल. सर्वत्र आपली वाहवा होईल. आज लाभ, यश, आनंदाची प्राप्ती कराल. मित्रमंडळींसमवेत दिवस मजेत जाईल.

कन्या
आपण मुळत: बुद्धिमान, हरहुन्नरी, व्यवहारकुशल आहात. आज आपल्यातील या कलागुणांचा वापर करून आपले ईप्सित कार्य पूर्णत्वास न्याल. संपूर्ण दिवस कार्यमग्न राहाल. वेळेचे योग्य नियोजन आज साधावे लागेल. कामे अनंत मात्र वेळ कमी अशी स्थिती असेल.

तुळ
आपण मुळत: कलाप्रिय, रसिक स्वभावाचे आहात. आपल्यातील कलागुण, रसिकता, मधुर बोलणे – वागणे यांचा योग्य वापर करून आज भाग्याची, सौख्याची प्राप्ती कराल. नोकरीनिमित्त प्रवासाचे योग संभवतात. आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

वृश्चिक
आजचा आपला दिवस काहीसा चिंताग्रस्त, तणावयुक्त असेल. आपल्यातील ताकद, धडाडी, शौर्य यांचा अतिरेक आज टाळावा. मन शांत व बुद्धी स्थिर ठेवावी. नको त्या गोष्टीत विनाकारण लक्ष देणे टाळावे. अन्यथा मनस्ताप करण्याची वेळ येऊ शकते. सबुरीने वागावे.

धनु
सदैव उत्साही, संशोधनप्रिय, लढवय्या असे आपले व्यक्तिमत्त्व आहे. त्यानुसार आजही आपण उत्साही, आनंदी असाल. वैवाहिक जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल. आपणही जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्याल.

मकर
आजचा आपला दिवस काहीसा खडतर असेल. मात्र आपण मूळत: मेहनती व कष्टकरी आहात. त्यामुळे आजही केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. मात्र आज आरोग्याच्या तक्रारी सतावतील, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. विनाकारण कोणावरही विश्वास ठेवू नये. सावध राहावे.

कुंभ
आपण मुळतः बुद्धिमान, ज्ञानी आहात. आजचा दिवसही आपण आपल्या बुद्धिचातुर्याने अगदी आनंदात मजेत व्यतीत कराल. आपल्यातील सुप्त कलागुण, छंद, आवडीनिवडी यांच्यासाठी आज वेळ काढाल. विद्यार्थ्यांनीही आजच्या दिवसाचा सदुपयोग करावा.

मीन
आजचा आपला दिवस उत्तम गृहसौख्याचा आहे. आपल्या गोड, नम्र, ममताळु स्वभावाने आज घरातील सर्वांची काळजी घ्याल. घरातील बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज झपाट्याने पूर्ण कराल. ज्येष्ठांची सेवा कराल व त्यांचे आशिर्वाद प्राप्त कराल.

Latest Posts

Don't Miss