Sunday, May 5, 2024

Latest Posts

MNS च्या पदाधिकाऱ्यांना ठोस सूचना, Mahayuti ला पाठिंब्याबाबत मांडली पक्षाची भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ‘बिनशर्त पाठिंबा’ देत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन पाठिंबा देण्याचे आदेशही दिली होते. त्यानंतर, मनसैनिकांनी महायुतीच्या प्रचारात सामील होत त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु, मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी संजय निरुपम आणि रवींद्र वायकर यांना मनसेतर्फे पाठिंबा दिला जाणार नाही, असे वक्तव्य आपल्या ‘X’ अकाऊंटवरून केले होते. आता मनसेच्या अधिकृत ‘X’ हॅण्डलवरून याबाबत खुलासा मोठे स्पष्टीकरण दिले आहे.

मनसेच्या अधिकृत ‘X’ हॅण्डलवरून मनसे नेते शिरीष सावंत यांचे पत्र शेअर करण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी म्हंटले आहे, “काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यानी, महायुतीच्या या उमेदवाराला आमचा पाठींबा नाही, त्या उमेदवाराबद्दल आमची नाराजी आहे, अशी विधाने केली. ही विधाने पूर्णतः अप्रस्तुत आहेत, ती त्यांची व्यक्तिगत मते आहेत, त्यामुळे माध्यमांनी पण ही भूमिका पक्षाची भूमिका म्हणून बघू नये.”

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारताचे पंतप्रधान सन्माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. माध्यमांना पण विनंती आहे की, मा. राजसाहेबांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे तुम्हाला काही माहिती हवी असेल तर पक्षातील नेते आणि नियुक्त प्रवक्ते यांच्याशीच संवाद साधावा. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर नोंद घ्यावी.”

याअगोदर, मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून महायुतीच्या नेत्यांवर जोरदार आगपाखड केली होती. त्या म्हणाल्या, “मनसेला ‘धनुष्य बाण’ चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर (Ravindra Waykar) सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये.”

हे ही वाचा:

‘इंग्रजी बोलतो म्हणजे लय शहाणा झाला?’ Sharad Pawar यांचा Sujay Vikhe Patil यांना टोला

‘घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकत नाही त्यांनी…’ Sanjay Raut यांची PM Modi यांच्यावर जहरी टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss