Friday, May 3, 2024

Latest Posts

तुम्हाला देखील स्ट्रॉबेरी लेग ची समस्या आहे ?, तर हे करा उपाय

आपली त्वचा ही एका प्रकारामध्ये मोडत असते. प्रत्येकाचं सौंदर्य हे त्याच्या त्वचेच्या कायेवरून ठरवलं जात. स्त्रिया आपल्या त्वचेला फार जपतात. परंतु तुमची त्वचा जर सुरकुत्या पडलेली असेल किंवा त्वचेवर डाग असतील तर आपला आत्मविश्वास कमी होतो. त्वचेच्या आजाराने बरेच जण त्रासलेले असतात.

आपली त्वचा ही एका प्रकारामध्ये मोडत असते. प्रत्येकाचं सौंदर्य हे त्याच्या त्वचेच्या कायेवरून ठरवलं जात. स्त्रिया आपल्या त्वचेला फार जपतात. परंतु तुमची त्वचा जर सुरकुत्या पडलेली असेल किंवा त्वचेवर डाग असतील तर आपला आत्मविश्वास कमी होतो. त्वचेच्या आजाराने बरेच जण त्रासलेले असतात. त्वचेची समस्या ही फक्त चेहर्यापर्यंत सिमीत नसते. तर त्वचा म्हंटल कि संपूर्ण त्वचेचा भाग ग्राह्य धरला जातो. तसेच या स्ट्रॉबेरी लेग (Strawberry Legs) या समस्येमध्ये पायांवर काळे काळे डाग दिसतात. बहुदा हे डाग मोठे असतात व दिसताना ते कुरूप दिसतात. स्ट्रॉबेरी लेग हि समस्या पाय तेल, बॅक्टेरिया आणि मृत त्वचेमुळे उद्भवते . तसेच पुरुष वर्ग देखील जेव्हा दाढी कारतो त्यानंतर नंतर छिद्र उघडे सोडतो. तेव्हा छिद्रांमध्ये हवा जाते आणि तेल ऑक्सिडाइज होते. नंतर ऑक्सिडाइज्ड तेल त्वचेवर काळे डाग आणि स्ट्रॉबेरीच्या बियांसारखे वाढलेले अडथळे दिसू लागते.

  • शेविंग (Shaving care) करताना काळजी घ्या. क्रीम न वापरता शेव्हिंग केल्याने स्ट्रॉबेरी लेग समस्या होऊ शकते . म्हणूनच चांगल्या दर्जाचे शेव्हिंग क्रीम किंवा लोशन (lotion) नेहमी वापरावे. शेव्हिंगसाठी अशी क्रीम वापरा जी त्वचेला जास्त काळ थंडावा देईल आणि हायड्रेट करेल. तसेच त्वचेचा कोरडेपणा टाळा. यामुळे स्ट्रॉबेरी लेग्सची (Strawberry Legs) समस्या कमी होते.

  • त्वचा नेहमी मॉश्चराइज (Moisturize) ठेवा. नेहमी घट्ट दूध किंवा बदामावर आधारित मॉइश्चरायझर वापरा. ते त्वचेला खोलवर पोषण देते. तसेच सतत पाणी प्या त्यापुळे त्वचेत ओलावा राहतो, सुरकुत्या पडत नाहीत व ड्राय स्किन समस्या दूर होतात.
  • त्वचा एक्सफोलिएट (Exfoliate) करा. अंघोळ करताना नियमितपणे त्वचा एक्सफोलिएट केल्याने त्वचेवर साचलेले बॅक्टेरिया आणि घाण निघून जाते. यासाठी तुम्ही बाजारातील एक्सफोलिएटर्स किंवा होममेड स्क्रब वापरू शकता.

हे ही वाचा:

Balsaheb Thackeray Jayanti 2023, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील अखेरचा ‘राजकीय संवाद’ काय होता हे तुम्हाला माहित आहे का ? घ्या जाणून

आज होणार ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा, ‘या’ ठिकाणी करणार युतीची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss