Friday, May 3, 2024

Latest Posts

शरीर फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात सॅलेडचा समावेश करा आवर्जून

आपला आहार हा आपल्या जडणघडणीस कारणीभूत असतो. योग्य आहार घेतल्याने शरीराची योग्य वाढ होते. त्यामुळे आहारात सर्व पदार्थांचा समावेश असायला हवा. पौष्टिक आहार आरोग्यास सर्व आजारांपासून दूर ठेवतो. आहारातील पोषक घटक शरीराला पोषण प्रदान करत असतात.

आपला आहार हा आपल्या जडणघडणीस कारणीभूत असतो. योग्य आहार घेतल्याने शरीराची योग्य वाढ होते. त्यामुळे आहारात सर्व पदार्थांचा समावेश असायला हवा. पौष्टिक आहार आरोग्यास सर्व आजारांपासून दूर ठेवतो. आहारातील पोषक घटक शरीराला पोषण प्रदान करत असतात. आपण रोजच्या जीवनात कोणता आहार घेतो याचे निरीक्षण करणे किंवा नोंद ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच रोजच्या जीवनात आपण भाजी पोळी, चपाती, डाळ भात खातोच पण बिट, गाजर, काकडी ही कंदमूळ देखील खातोच असे नाही. या पदार्थांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे,यामुळे लट्टपणा, मधुमेह, हृदयविकार या आजारांपासून ओला बचाव होतो. यामुळे रोजच्या जीवनात सॅलेड चा आहारात समावेश असावा. सॅलेडमध्ये फायबर्स असल्याने आरोग्यासाठी सॅलेड खाणे अतिशय चांगले असते.

  • जेवणात कोशिंबीर किंवा सॅलेड असेल तर आपले पोट भरते आणि आपोआपच आपण इतर पदार्थ कमी खातो. पचनही व्यवस्तीत होते. त्यामुळे जास्त खाल्ल्याने वाढणारे वजन नियंत्रणात येण्यात सॅलेडचा महत्त्वाचा सहभाग असतो.
  • सॅलेडमुळे शरीराला फायबर (fiber) तर मिळतेच पण त्यासोबत व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन सी हे घटक मिळण्यासही मदत होते.यामुळे शरीराला चांगले पोषण मिळते व शरीराची योग्य वाढ होते.

  • सॅलेडचा (salad)रोजच्या आहारात समावेश केल्यास रक्तातील साखरेचे (blood in sugar) प्रमाण कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यासही याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे हृदयविकार, मधुमेह, पोटाचे त्रास कमी होतात आणि आरोग्य चांगले राहते.
  • वेगवेगळ्या फळ भाज्यांमध्ये ॲण्टीबायोटिक(Antibiotic) गुणधर्म असतात. त्यामुळे आपण कोणत्याही आजाराशी लढू शकतो , उर्जा (energy) शरीराला मिळते,तसेच व्हिटॅमिन सी देखील असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

हे ही वाचा:

पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक जाहीर, २७ फेब्रुवारीला होणार मतदान

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळीचा हटके लूक, फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss