Monday, May 6, 2024

Latest Posts

Amit Shah यांचा Uddhav Thackeray यांना टोला, दिला जय भवानीचा नारा

सध्या निवडणुकीचा काळ सुरु असता प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारात व्यस्त आहे. मागेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचं 'मशाल' गीत लाँच केलं होत. गीत लाँच झाल्यानंतर काही दिवसातच निवडणूक आयोगाची नोटीस उद्धव ठाकरेंना आली होती. त्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. शिवाय त्यावेळी आपण आपल्या गीतातील जय भवानी जय शिवाजी हा नारा काढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या निवडणुकीचा काळ सुरु असता प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारात व्यस्त आहे. मागेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचं ‘मशाल’ गीत लाँच केलं होतं. गीत लाँच झाल्यानंतर काही दिवसातच निवडणूक आयोगाची नोटीस उद्धव ठाकरेंना आली होती. त्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. शिवाय त्यावेळी आपण आपल्या गीतातील ‘जय भवानी जय शिवाजी’ हा नारा काढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याच एका नाऱ्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाची नोटीस आली होती. पण ती नोटीस धुडकावत आधी मोदी आणि शाह यांच्यावर देखील कारवाई करा आणि मग आम्ही गीतातील शब्द हटवू अशी प्रतिक्रिया देखील केली होती.

सध्या निवडणुकीमुळे नरेंद्र मोदी एकामागे एक अश्या सभा महाराष्ट्रात घेत आहे. सध्या अमित शाह यांची देखील सभा महाराष्ट्रात पार पडत आहे. भाजपला महाराष्ट्रातील ४८ पैकी सर्वाधिक जागा जिंकायच्या असल्याने भाजप सरकारचे प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधान मोदींनी आजवर नागपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणी या ठिकाणी सभा घेतल्या आहेत. तर गृहमंत्री अमित शाह यांनी काल अकोल्यात सभा घेतली तर ते आज अमरावती येथे सभा घेणार आहेत. अकोल्यातील सभेत अमित शाह नी शरद पवार यांवर निशाणा साधला तर देशाचा विकास होण्यासाठी मोदींना निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. काल अमित शाह यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देत जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. अकोलेकर या निवडणुकीत मोदींसोबत आहेत का? मोदींना ते आशीर्वाद देणार का कमळासमोरील बटण दाबणार का? असा सवाल अमित शाह यांनी अकोलेकरांना केला. त्यांनी भाषणादरम्यान काँग्रेसवर देखील निशाणा साधला. माझ्याबरोबर हात उंचावून घोषणा द्या, भारत माता की जय……. वंदे मातरम ….. वंदे मातरम…. शिवाजी महाराजांची घोषणा द्या जय शिवाजी…. जय भवानी….जय जय जय जय जय शिवाजी…. जय जय जय जय जय भवानी… अशी घोषणाबाजी अमित शाह यांनी केली. ‘जय भवानी जय शिवाजी’ या शब्दांवरून मागेच झालेल्या वादामुळे आता पुढे काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Amravati मध्ये Bachchu Kadu यांच्या सभेची परवानगी नाकारून Amit Shah यांची होणार सभा, प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss