Saturday, May 4, 2024

Latest Posts

सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस प्रमुख संजय पांडे यांना ताब्यात घेतले

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्नूपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ताब्यात घेतले. त्यांना यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक तपासासाठी ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दिल्लीतील एका न्यायालयाने पांडेची चार दिवसांची सीबीआय कोठडी सीबीआयकडे मंजूर केली असून तपास संस्थेकडे तपास सुरू ठेवण्यासाठी पुरेशी कारणे आहेत, अशी बातमी एएनआयने दिली. CBI ने पांडे आणि त्यांची कंपनी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कथित फोन टॅपिंगच्या संदर्भात एफआयआर दाखल केले होते. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या अगोदर दिल्ली ईडीकडून अटक झाली होती. आणि त्यांची चौकशीही सुरु होती. दरम्यान, २ ऑगस्टला त्यांना रोज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना १६ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर पांडे यांच्यावतीनं जामिनासाठी देखील अर्ज दाखल करण्यात होता. परंतु त्यांना जामीन मिळाला नव्हता.

१९ जुलै रोजी ईडीने अटक केलेला पांडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.९ सप्टेंबर रोजी, ईडीने एनएसई मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.आरोपपत्रात चित्रा रामकृष्ण, रवी नारायण (दोघेही एनएसईचे माजी सीईओ) आणि पांडे आणि त्यांच्या फर्मची नावे असल्याचे म्हटले आहे.एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन-टॅपिंगशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नरेनला ऑगस्टमध्ये ईडीने अटक केली होती. या प्रकरणात ईडीने अटक केलेला नरेन हा तिसरा व्यक्ती आहे.

हे ही वाचा:

WhatsApp आणि OTT प्लॅटफॉर्म कायद्याच्या कक्षेत,जाणून घ्या दूरसंचार विधेयकाशी संबंधित महत्वाचे मुद्दे

Central railway : फर्स्ट क्लास तिकीट धारकांना आता, एसी लोकलमधील प्रवासाची तरतूद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss