Thursday, May 2, 2024

Latest Posts

तुम्हाला फक्त १०० कोटीत रस; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

तुम्हाला हवे काय? आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री...उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना सेवेत घेणारा गृहमंत्री....तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र करणार तरी काय महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई?

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. “१०० कोटी वसूल करून देणारे गृहमंत्री तुम्हाला आवडत असतील तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार?” अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ अपलोड करून सुप्रिया सुळे यांच्यावर टीकांचा वर्षाव केला आहे. त्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या आहेत की, राज्याच्या मोठ्ठ्या ताई…सुप्रियाताईंना १०० कोटी वसूली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री त्यांना आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, कारण; ससून प्रकरणात ९ पोलिस निलंबित झाले, पण तुम्हाला ते आवडले नसेल कारण; हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या, पण तेही तुम्हाला आवडले नसेल कारण; कारण, तुम्हाला फक्त १०० कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री… तुम्हाला हवे काय? आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री…उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना सेवेत घेणारा गृहमंत्री….तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र करणार तरी काय महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई?

“अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर त्याचा मला आनंदच असेल, त्यांना पहिला हार मी घालणार, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला संधी द्यावी”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. तसेच, अजित पवार यांनी राज्याच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद देऊ नये, असेही त्या म्हणाल्या होत्या. यावर उत्तर म्हणून भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली आहे.

हे ही वाचा: 

संजय राऊत यांना फुलटॉस देऊ नका – नितेश राणे

ठरलं तर मग ! यंदा शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss