Tuesday, May 7, 2024

Latest Posts

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ

२०२३च्या शेवटच्या डिसेंबर महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे.

२०२३च्या शेवटच्या डिसेंबर महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. पण वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. आजपासून LPG सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ झाली आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात पहिल्याच तारखेपासून सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी, तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत ४१ रुपयांनी (LPG Price Hike) वाढ झाली आहे, तर ही वाढ १९ Kg व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Price) दरांत करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत आता १७९६. ५० रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १७२८.०० रुपयांवरुन १७४९.०० रुपये झाली आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमती IOCL वेबसाईटवर अपडेट करण्यात आल्या आहेत. बदल झालेल्या सर्व किमती १ डिसेंबरपासून लागू करण्यात येतील. दिवाळीपूर्वी तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत १०३ रुपयांनी वाढ केली होती आणि १ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्लीत त्याची किंमत १८३३.०० रुपये झाली होती, मात्र १६ नोव्हेंबरला छठ पुजेच्या निमित्ताने एलपीजी सिलेंडवर काहीसा दिलासा देण्यात आला होता. आणि सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी कमी करत १७५५.०० रुपये झाली होती, पण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात पुन्हा एकदा एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर पुन्हा एकदा ४१ रुपयांनी वाढवले आहेत.

दिल्लीत आजपासून १९ किलोचा एलपीजी सिलेंडर १७५५.०० रुपयांऐवजी १७९५. ०० रुपये झाली आहे. तर कोलकातामध्ये त्याची किंमत १८८५.०० रुपयांवरून १९०८.०० रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १७२८. ०० रुपयांवरुन १७४९.००रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरसाठी १९४२.००रुपयांऐवजी १९४२.०० रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. एकीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत. तर तेल कंपन्यांनी १४ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आल्यानुसार, दिल्लीत घरगुती सिलेंडर 9.3 रुपयांना, कोलकात्यात ९२९ रुपयांना, मुंबईत १९४२.०० रुपयांना आणि चेन्नईत ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

हे ही वाचा:

MUMBAI: गिरगावात पहिला क्यूआर कोड चौक, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

जागतिक एड्स दिन २०२३: जागतिक एड्स दिनाचा इतिहास आणि यंदाची थीम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss