Wednesday, May 1, 2024

Latest Posts

अजितदादा मुख्यमंत्री होणार ही न घडणारी गोष्ट- शरद पवार

सध्या अजित पवार यांनी भाजप पक्षासोबत हातमिळवणी केल्यापासून अजितदादा मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यात “अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर त्याचा मला आनंदच असेल, त्यांना पहिला हार मी घालणार, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला संधी द्यावी”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. 

शरद पवार यांना अकोल्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले की, “अजितदादा मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ही न घडणारी गोष्ट आहे. तसेच अजित पवार यांना निवडणुकीत स्वीकारायचं की नाही हे जनताच ठरवेल, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या अजित पवार यांनी भाजप पक्षासोबत हातमिळवणी केल्यापासून अजितदादा मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यात “अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर त्याचा मला आनंदच असेल, त्यांना पहिला हार मी घालणार, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला संधी द्यावी”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती.

मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याची जबाबदारी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण सोडताना ज्यांनी त्यांना शब्द दिला ते काय करतात ते पाहू. तुम्ही देशाचं चित्र पाहा. ते चित्र भाजपच्या विरोधी आहे.  तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र, तेलंगना, राजस्थान, झारखंड, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल या ठिकाणी भाजपची सत्ता नाही. असे मत शरद पवार यांनी मांडले आहे. शरद पवार असंही म्हणाले की, “सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं हा भुजबळांचा प्रस्ताव होता. तो आमचा प्रस्ताव नव्हता. पण तो स्वीकारला नाही. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची पुढची जी स्टेप होती ती मान्य नव्हती. भाजपसोबत जाण्याचा काही लोकांचा आग्रह होता, ही गोष्ट खरी आहे.”

हे ही वाचा: 

संजय राऊत यांना फुलटॉस देऊ नका – नितेश राणे

ठरलं तर मग ! यंदा शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss