Saturday, May 4, 2024

Latest Posts

MPSC परीक्षेतील ‘या’ बदलांमुळे विद्यार्थ्यांनी केले होते आंदोलन

अलीकडेच राज्यसेवा मुख्यपरीक्षेचा नवीन पॅटर्न हा राज्यसेवा मंडळाच्या आदेशाने २०२३ या वर्षांपासून लागू करण्यात आला आहे. पण विद्यार्थ्यांनी ‘व्यक्तिनिष्ठ पॅटर्न’नुसार गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी सुरू केली असल्याने त्यांनी हा निर्णय २०२५ पर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली होती.हि मागणी पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे पुण्यामध्ये आंदोलन करत होते. अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतला होता. ती मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून पूर्ण करण्यात आली आहे.पण राज्यसेवा मुख्यपरीक्षेमध्ये असा कोणता बदल करण्यात आला होता ते आता आपण जाणून घेणार आहोत.

अलीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा देण्यासाठी वेगळा पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम देखील काढण्यात आला होता. आणि नवीन नियमांनुसार पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम वेगळा होता. पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा इतिहास , महाराष्ट्र राज्याचा भूगोल, राज्यात घडणाऱ्या घडामोडी , महाराष्ट्र राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यातील औद्योगिक घडामोडी इ. विषयांवर परीक्षेत प्रश्न विचारले जात असे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशाने यामध्ये बदल करण्यात आले होते. ते बदल म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती अधिक वर्णनात्मक केली गेली होती आणि तो अभ्यासक्रम UPSC च्या परीक्षा पद्धतीसारखा करण्यात आला होता. म्हणजेच की या नवीन नियमांनुसार हा अभ्यासक्रमाध्ये भारतामध्ये आणि जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींवर प्रश्न विचारले जाणार होते. नवीन अभ्यास क्रमानुसार राज्यसेवा मुख्यपरीक्षेच्या विद्यार्थ्यांना भारताचा आणि जगाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागणार होता. त्याच बरोबर देशात आणि जगभरात घडणाऱ्या घडामोडी, देशभरातील राजकीय घडामोडी, जगभरातील आर्थिक घडामोती, अर्थसंकल्प अशा अनेक विषयांचा या विद्यार्थ्यांना अध्यास करावा लागणार होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्यपरीक्षेचा पुरविला पेपर पॅटर्न हा वेगळा होता. यामध्ये विद्यार्थ्यांना उमेदवारांना बहु-निवडक प्रश्न (MCQ) विचारण्यात येत होते. आणि  नवीन पॅटर्न नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्यपरीक्षेचा पुरविला पेपर हा व्यक्तिनिष्ठ असेल आणि उमेदवारांना बहु-निवडक प्रश्न (MCQ) न वापरता सविस्तर उत्तरे लिहावी लागणार होती.

हे ही वाचा:

रुतुराजच्या वाढदिवशी चर्चा होतेय सायली संजीवच्या पोस्टची, अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्रीने केले भाष्य

मोदी आज तेच करतायत ना, दारूड्याचे उदाहरण देत प्रकाश आंबेडकरांनी केली मोदींवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss