Sunday, May 5, 2024

Latest Posts

Dr. Shrikant Shinde चा डोंबिवली दौरा, विविध ठिकाणी दिली भेट

कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असलेले डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली विभागात अनेक ठिकाणी भेट देऊन कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. भगवान महावीर जयंती निमित्त डोंबिवलीत जैन धर्मिय बांधवांकडून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत डॉ.शिंदे सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी चार रस्ता येतील जैन मंदिरात जाऊन भगवान महावीर यांना वंदनही केले.

वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, या हेतूने डोंबिवलीतील ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या वतीने डोंबिवलीच्या फडके रोडवर बुक स्ट्रीट फेस्टिवल या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे एक लाख पुस्तके वाचकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपक्रमाला श्रीकांत शिंदे यांनी आवर्जून भेट दिली आणि आवडीची काही पुस्तकेही घेतली. विशेष म्हणजे सकाळी ५ वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमाला डोंबिवलीकरांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, विधानसभा अध्यक्ष संतोष चव्हाण, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, रवी पाटील, नितीन पाटील, जनार्दन म्हात्रे, बंडू पाटील तसेच पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, भूषण पत्की, दर्शना सामंत, वृंदा भुस्कुटे, ललिता छेडा, श्रीकांत पावगी, रसिका कुसुरकर, यांच्यासह युवासेना शहर अधिकारी सागर जेधे, युवासेनेचे राहुल म्हात्रे यांच्यासह शेकडो पुस्तक प्रेमी आणि डोंबिवलीकर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कोकण प्रांत प्रमुख बापू मोकाशी यांच्या निवासस्थानीसुद्धा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी  सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मोकाशी कुटुंबियांनी आपुलकीने स्वागत आणि आदरातिथ्य केले. या प्रसंगी रवींद्र मोकाशी, पर्णाद मोकाशी यांच्यासह मोकाशी कुटुंबिय, सुनील चौधरी, सचिन चिटणीस, अध्यक्ष माधव सिंग, सचिव तुषार फिरके यांच्यासह डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, विधानसभा प्रमुख संतोष चव्हाण, तालुका प्रमुख महेश पाटील आणि सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते. यानंतर ग्लोब पॅराडाईझ सोसायटीतील सदस्यांशी संवाद साधत त्यांना कल्याण लोकसभेच्या गतिमान प्रगतीची माहिती दिली. तसेच येत्या २० मे रोजी सर्वांनी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. यासोबतच, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील कच्छ युवक संघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली. तसेच यावेळी उपस्थित रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुकही केले. याप्रसंगी कच्छ युवक संघाचे भरत गोगरी, परेश छेडा, राजेश मारू, पंकज कारानी, भारती सावला यांच्यासह डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, तालुकाप्रमुख महेशपाटील उपस्थित होते.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका, Parbhani, Nanded येथे आज प्रचारसभा

घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या Narendra Modi ना चीन घरात घुसल्याचे कसे दिसत नाही? – Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss