Thursday, May 2, 2024

Latest Posts

ठाण्यात बसचा थरार; खासगी बस थेट घुसली घरात

काही वर्षपूर्वी मनोरुग्ण संतोष माने या व्यक्तीने बस चालवून कहर केला होता.

काही वर्षपूर्वी मनोरुग्ण संतोष माने या व्यक्तीने बस चालवून कहर केला होता. या दुर्घटनेमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता आणि ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या घटनेमुळे पुणेकरांच्या मनात भीती निर्माण झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती ठाण्यामध्ये झाली आहे. ठाण्यातील एका बस चालकाने मद्यधुंद अवस्थेमध्ये थेट एका घरात बस घुसवली. बस घरात घुसल्यानंतर घरातील लोक लगेच पळून गेले. बस अचानक घरात घुसल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी या बसचालकाला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले आहे. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरी रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री ९ वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे. एका खाजगी बस अचानक घरात घुसून अपघात झाल्याने सगळ्यांचं धक्का बसला आहे. बस चालक हा दारूच्या नशेत बस चालवत होता. त्यानंतर त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस डायरेक्ट घरात घुसली. या घटनेमध्ये सुद्यवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पण घराचे आणि आजूबाजूच्या परिसरातील गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ठाण्यातील कोपरी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. खासगी कंपन्यांच्या बसेस पीक ड्रॉपसाठी या ठिकाणी जमतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी तिकडे निर्माण होते. वाहनांची सतत वर्दळ असल्याने कर्ण कर्कश आवाजही या परिसरात ऐकायला मिळतात.

काल रात्री ठाण्यातील कोपरी परिसरातून ही खाजगी बस जात होती. त्यानंतर वाहन चालकाचे बस वरून नियंत्रण सुटले आणि त्यानंतर ती बस थेट घरात घुसली. बसच्या या धडकेत मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले आहे. प्रसंगावधान राखून घराबाहेर पडल्याने कोणताही जीवित हानी झाली नाही. त्यानंतर संतप्त नागरिकांनी वाहन चालकाला मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली केले. हा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. बस थांबा या परिसरात अनेक लहान मुलं बाहेर खेळत असतात. नागरिकांची नेहमीच वर्दळ चालू असते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बस चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी तेथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हे ही वाचा: 

संजय राऊत यांना फुलटॉस देऊ नका – नितेश राणे

माधवी निमकरनं शेअर केला “सुख म्हणजे नक्की काय असतं” शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss