Sunday, May 5, 2024

Latest Posts

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुण्यामध्ये गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तविली

पुणे (Pune) शहरामध्ये गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जाहीर केला आहे.

पुणे (Pune) शहरामध्ये गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जाहीर केला आहे. दिवसभर पुण्यामध्ये आकस ढगाळ राहणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे पुणेकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. या पावसामुळे पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. पुण्यामध्ये कात्रज, हडपसर आणि स्वारगेट परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामधून कमी दाबाचा पट्टा जात आहे.

पुढील काही दिवस ढगाळ वातावरणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता आणि दिवसा तापमानामध्ये वाढ झाल्याने वातावरण अस्थिर झाले आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून कमाल तापमानामध्ये घट झाल्याने पुणेकर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यामध्ये कमाल तापमानाने ४० अंश (40 degrees) सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. परंतु दोन दिवस तापमान ४० अंशांच्या खाली गेले आहे. पुणे जिल्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे. पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या जिल्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहेत असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शहरातील कोथरुड परिसर, हडपसर, मांजरी परिसरामध्ये आज सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळीच अचानक सुरु झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. याशिवाय वाघोली परिसरात देखील जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचे थैमान घातले आहे. त्यामुळे शेकऱ्याचे हाताशी आलेले पीक आडवे झाले आहे. सोबतच राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss