Sunday, May 5, 2024

Latest Posts

Parents Day Gift, आपल्या पालकांना द्या या ‘खास’ भेटवस्तू

२३ जुलै हा दिवस पालकदिन म्हणून साजरा केला जातो. हा संपूर्ण दिवस पालकांसाठी साजरा केला जातो. आपले पहिले गुरु आपले पालकच असतात.

२३ जुलै हा दिवस पालकदिन म्हणून साजरा केला जातो. हा संपूर्ण दिवस पालकांसाठी साजरा केला जातो. आपले पहिले गुरु आपले पालकच असतात. तेच आपल्याला घडवतात. आपल्या वाईट प्रसंगात नेहमी आपल्यासोबत खंबीर उभे राहतात. आपल्या मुलांसाठी प्रत्येक गोष्ट ते निस्वार्थ वृत्तीने करत असतात. पालकदिनानिमित्त तुम्ही या विशेष दिवशी आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना भेटवस्तू देऊ शकता. याच भेटवस्तूतील काही निवडक वस्तू आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या पालकांना या पालकदिनानिमित्त देऊ शकता.

कौटुंबिक फोटो अल्बम: पालकांना एक फोटो अल्बम भेट द्या. या फोटोमध्ये तुम्ही तुमच्या आई आणि वडिलांसोबत शेअर केलेले स्मरणीय क्षण आणि आठवणी कॅप्चर केल्या असतील.
दागिने: तुमच्या पालकांनाआवडीचे दागिने घालण्याची इच्छा असेल, बरोबर? तुमचे बजेट लक्षात ठेवा आणि शक्य असल्यास तुमच्या पालकांना अंगठी आणि नेकलेससारखे दागिने द्या.3
२३ जुलै रोजी तुमच्या पालकांना ट्रिपसाठी कुठेतरी घेऊन जा. त्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जा आणि एकत्र जेवणाचा आनंद लूटा.
गिफ्ट बास्केट: तुम्ही तुमच्या पालकांच्या आवडत्या वस्तू आणि खाद्यपदार्थ बास्केटमध्ये भरून हा बास्केट भेट म्हणून पालकांना देऊ शकता.
स्मार्टफोन: तुमच्या पालकांना अपडेट करण्यासाठी तुम्ही त्यांना तुमच्या बजेटनुसार त्यांना एक स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळ यासारखी गॅझेट भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

हे ही वाचा:

मुंबईसह मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा

World Food Day 2022 : जागतिक अन्न दिनानिमित्त काही खास विविध राज्यातील पारंपरिक पदार्थ

BMC कथित कोविड घोटाळा प्रकरणात आता SIT पथक ऍक्शनमोडमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss