Rahul Gandhi यांनी साधला मोदींवर निशाणा, अहंकारी राजा…

आज दिनांक २८ मे २०२३ (रविवार) रोजी संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्लीत सुरु असणाऱ्या सोहळ्याकडे लागले होते. याच मुख्य कारण म्हणजे आज दिल्लीत देशाच्या नवीन संसदभवनाचं उद्घाटन झालं आहे. आज अखेर देशाला नवीन संसद भवन हे मिळाल आहे.

Rahul Gandhi यांनी साधला मोदींवर निशाणा, अहंकारी राजा…

आज दिनांक २८ मे २०२३ (रविवार) रोजी संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्लीत सुरु असणाऱ्या सोहळ्याकडे लागले होते. याच मुख्य कारण म्हणजे आज दिल्लीत देशाच्या नवीन संसदभवनाचं उद्घाटन झालं आहे. आज अखेर देशाला नवीन संसद भवन हे मिळाल आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून संसद भवनाच्या पूजेने या सोहळ्याला सुरुवात झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तर एकीकडे हा सोहळा पार पडत होता तर दुसरीकडे अनेक राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार हा टाकला होता. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आवाज उठवला. राहुल गांधी म्हणाले, “राज्याभिषेक पूर्ण झाला – ‘अहंकारी राजा’ रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे.” नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक आणि भाजप सरकारमध्ये वाद सुरू आहेत. वास्तविक, नवीन संसदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी विरोधकांची इच्छा होती. तसेच आपल्या ट्विटमध्ये, काँग्रेस नेत्याने जंतरमंतरवर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंची एक छोटी क्लिप देखील शेअर केली आहे. क्लिपमध्ये राहुल गांधी महिला कुस्तीपटूंच्या अटकेचे चुकीचे वर्णन करतात आणि म्हणतात की बेटी बचाओ और बेटी पढाओ ही नवीन घोषणा आहे… पण बेटी कोणापासून वाचवा, तिला भाजपपासून वाचवा.”

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version