Sunday, May 5, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश

राज्यात झालेल्या सत्तातरानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन शिवसेना गट राजकारणात तयार झाले आहेत. ठाकरे गट हा महाविकासघडी सोबत आहे तर शिदंडे गट हा फडणवीसांसोबत आहे. म्हणजेच काय तर महाविकासआघाडी आणि शिंदे फडणवीस सरकार असे चित्र बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अमेय घोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केलाय.

राज्यात झालेल्या सत्तातरानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन शिवसेना गट राजकारणात तयार झाले आहेत. ठाकरे गट हा महाविकासघडी सोबत आहे तर शिदंडे गट हा फडणवीसांसोबत आहे. म्हणजेच काय तर महाविकासआघाडी आणि शिंदे फडणवीस सरकार असे चित्र बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अमेय घोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केलाय. अमेय घोले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले. अमेय घोले यांनी मोठा पक्षप्रवेश करू असं म्हंटलं होत,मात्र खारघरमध्ये दुर्दैवाने दुर्घटना घडली आणि त्यामुळे अतिशय साधेपणाने अमेय घोले यांनी हा प्रवेश केला असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अमेय घोले आणि त्याच्या वार्डातील व मतदारसंघातील सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं मी शिवसेनेत मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. खरं म्हणजे अमेय घोले म्हणाला होता की, तसेच “आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर आमदार, खासदार, शिवसेनेचे नेते, उपनेते व अगदी संघटनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी असे हजारो-लाखो कार्यकर्ते राज्यभरातून आपल्या शिवसेनेत दाखल होत आहेत. याचं कारण गेल्या सात-आठ महिन्यात आपल्या सरकारने लोकांसाठी काम केलं आहे. हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

त्याचबरोबर शिवसेना-भाजपा युतीच्या नव्या सरकारने लोकांना सोयीच्या २२७ वॉर्डची रचना केली. त्यावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केला आहे. हा लोकशाहीचा आणि आपल्या सरकारचा मोठा विजय आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.त्यामुळे सरकारने मागील सात-आठ महिन्यात घेतलेले निर्णय बघितले, तर ते लोकांच्या हिताचे आणि सर्वसमावेशक निर्णय आहेत. यात शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण, विद्यार्थी, महिला या सर्वांसाठी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मागील अडीच वर्षात जे प्रकल्प बंद पडले होते त्याला आम्ही चालना दिली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विश्वास निर्माण झाला आहे की, आपल्या लोकांना न्याय द्यायचा असेल, तर सरकारच्या माध्यमातून आपण तो न्याय देऊ शकतो.

हे ही वाचा : 

महाराष्ट्र भूषण पुरस्कारांमध्ये मृत पावलेल्या श्री सेवकांच्या या घटनेनंतर, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया

धनलाभासाठी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुळशीचे काही उपाय

Eid-ul-Fitr 2023, भारतात ईद-उल-फित्र कधी साजरी होईल, ईदची नेमकी तारीख आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss