Tuesday, May 7, 2024

Latest Posts

Vajramuth Sabha, Uddhav Thackeray Live, आंदण नाही तर मुंबई लढून मिळवली आहे,

तारखेला बारसूला जाणार आणि आणि मग महाडच्या सभेला जाणार आहे. बारसू मध्ये पाकव्याप्त काश्मीर नाही

आज १ मे महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यामध्ये आज महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा केला जात आहे. तर आजच महाविकास आघाडीची मुंबईमध्ये वज्रमूठ सभा पार पडत आहे. मुंबईमध्ये वांद्रे येथील बीकेसी (BKC) ग्राउंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ सभा पार पडत आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला संबोधित केले आहे.

यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. ६३ वर्षे झाली मराठी माणसाने महाराष्ट्राने स्वतःचे रक्त सांडून हे राजधानी मिळवली आहे. मुंबई लढून मिळवली आहे, आंदण मिळाली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. या मुंबईसाठी सर्वसामन्यांनी लढा दिला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बारसू चा मुद्दा देखील मांडला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले बारसूत अत्याचार . ६ तारखेला बारसूला जाणार आणि आणि मग महाडच्या सभेला जाणार आहे. बारसू मध्ये पाकव्याप्त काश्मीर नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहे. हे लोक माझ्या नावाचं पत्र नाचवतायत. उद्धव ठाकरेंनीच ही जागा सूचवली असं पत्र दाखवतायत. परंतु मी त्या पत्रात कुठे लिहिलंय का तिथे पोलिसांना घुसवा, शेतकऱ्यांवर लाठ्या चालवा, गोळ्या झाडा पण रिफायनरी करा, असं पत्रात कुठे लिहिलंय. असं देखील उद्धव ठाकरे म्हणले आहेत.

आपलं सरकार गेल्यानंतर या खोके सरकारने हि बीकेसी सारखी सोन्याची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली. परंतु कुठला मुंबईतला मराठी माणसू या बुलेट ट्रेनचा वापर कराणार आहे.बुलेट ट्रेनसाठी या लोकांनी बीकेसीतली सोन्याची जागा दिली असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. इंग्रजांपेक्षा भयंकर लूट ही भाजप सरकार करत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर नेले जात आहेत. बुलेट ट्रेनने कोण प्रवास करणार आहे? मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येत नाही म्हटल्यावर मुंबईला मारलं जात आहे. मुंबईतून अनेक प्रकल्प हे गुजरातला नेले. या आधी बाळासाहेबांनीही इशारा दिला होता, आता मीही सांगतो, कुणीही असो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर तुमचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. मराठी भाषा आम्ही सक्तीची केली पण मिंधे सरकार आलं आणि यांनी ती ऐच्छिक केली, बाळासाहेबांचे विचार असल्याचं सांगणाऱ्या मिंध्यांना काहीच वाटत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी शरद पवारांच्या सल्ल्याने काम करतोय असं म्हणणारे मिंधे, त्यांचे मंत्री आज शरद पवारांना भेटले. मग तुम्ही भेटलात तर चालतं? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

तसेच यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा सर्वसामान्यांनी दिला होता. मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षक सत्तेत बसला होता. मुंबई, गुजरातमध्ये गोळीबार केला होता. अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संपूर्ण गिरणगाव पेटला होता. पोलीस एवढे मातले होते की इमारतींवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. अनेकजण गुदरमरले. महिला रणरागिनी, तान्ही बाळं घेऊन रस्त्यावर उतरल्या आणि हिंमत असेल तर गोळ्या घाला, पण मुंबई घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असं महिला म्हणाल्या होत्या.

मिंदेंना सांगायचं आहे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. सर्व जाती धर्माची लोकं माझ्यासमोर बसले आहेत. कर्नाटकची निवडणूक जवळ आली आहे. पंतप्रधान म्हणाले काँग्रेसने त्यांना ९१ वेळा शिव्या दिल्या. मी शिव्या देण्याचं समर्थन करत नाही. पण तुम्हाला ज्यावेळेला वाटतं की शिव्या देतात तेव्हा तुमचे भोकं पडलेली तीनपाट बोलतात तेव्हा का बोलत नाहीत? आम्ही तुमचा मान ठेवतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तीनपाटांना आवरा. तुमचे काही बोलतील तर आम्ही ऐकून घेणार नाही. तसेच पुढे उद्धव ठाकरे म्हणले आहेत की, स्वत: ला हिंदुहृदयसम्राट होता येत नाही…म्हणून शिवसेनाप्रमुखांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे असते तर तुम्ही गद्दारी केली नसती. मिंध्याकडे बाळासाहेबाचे विचार नाहीत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे तुकडे करणारा कोणीही असो त्याचे तुकडे आम्ही करणार, हा आमचा इशारा समजा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्राने रक्त सांडून बलिदान देऊन आपली स्वतःची हक्काची ही राजधानी मिळवली आहे. ही लढून मिळवलेली राजधानी आहे. काल मध्यरात्री बारा वाजताच मी आदित्य आणि आपले शिवसैनिक हुतात्मा स्मारकाला हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करून आलो. पण मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा सर्व शिवसैनिक जमले होते. अरविंद सावंत होते. महाराष्ट्र दिवस एकवेळेस सुरू झाला की साधारणपणे मध्यरात्रीपासून आपण तिकडे सजावट करतो, घोषणाही करतो, पण काल आम्ही तेव्हा पोहोचलो तोपर्यंत सरकारकडून आणि महापालिकेकडून कोणी तिकडे फिरकलेला नव्हता. संपूर्णपणे फुलांची जी काही सजावट होती ती आपल्या शिवसैनिकांनी केली होती. तिकडे हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत असताना अभिवादन करताना मला एक सांगायचे की, त्यांनी लढा दिला नसता, संघर्ष केला नसता तर आज गद्दारी करून का होईना पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले तर मी हिदुत्व सोडलं, पण संघचालक मोहन भागवत मशिदीत जातात तेव्हा काय बोलणार? अस देखील उद्चीधव ठाकरे म्नहणाले आहेत. घुसखोरी करून आपला भूगोल बदलतोय आणि नाकर्ते राज्यकर्ते इतिहास पुस्तकात इतिहास बदलत बसलेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली

Latest Posts

Don't Miss