Saturday, May 4, 2024

Latest Posts

अजित पवारांकडून आपल्या सुपुत्रांना ग्रीन सिग्नल कधी मिळणार ???

सध्याचा राजकारणात बंडखोरीनंतर राजकारणात अनेक समीकरणे हि बदलली . मात्र त्यानंतर नव्या राजकारणाला सुरवात झाली. राष्ट्रवादीमध्ये अचानक अजित पवार यांनी बंडखोरी केल्यांनतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले.

सध्याचा राजकारणात बंडखोरीनंतर राजकारणात अनेक समीकरणे हि बदलली . मात्र त्यानंतर नव्या राजकारणाला सुरवात झाली. राष्ट्रवादीमध्ये अचानक अजित पवार यांनी बंडखोरी केल्यांनतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे दिसत आहे. त्यातच आता अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र राजकारणात सक्रिय झालेले बघायला मिळत आहे. अजित पवार यांच्या मिरवणुकीमध्ये पार्थ पवार हे त्यांच्या समवेत होते. कार्यकर्त्यांनी आता थेट अजित पवार यांच्याकडेच जय पवार यांना बारामतीच्या राजकारणात पार्थ पवार यांच्या सोबतच सक्रिय करावे, अशी मागणी करण्याचा निर्धार केला आहे. जय दादा तुम्ही आता बारामतीत ऍक्टिव्ह व्हायला हवे. आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्यामुळे तुम्ही आता बारामतीत यायला पाहिजे, असा प्रेमळ आग्रह बारामतीतील कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांना केला.

अजित पवार यांच्या भव्य सत्कारानंतर जय पवार आज बारामतीत आले होते. त्यांनी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व कार्यालयाची पाहणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील व बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव हेही उपस्थित होते. अजितदादांच्या नागरी सत्कार समारंभाला उपस्थित राहू न शकलेले जय पवार आज आवर्जून बारामतीत आले होते.त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी वरील मागणी केली. यासंदर्भात तुम्ही अजितदादांना विचारा त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच कामाला लागतो, असे उत्तर जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. कार्यकर्त्यांनी आता थेट अजित पवार यांच्याकडेच जय पवार यांना बारामतीच्या राजकारणात पार्थ पवार यांच्या सोबतच सक्रिय करावे, अशी मागणी करण्याचा निर्धार केला आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे दिसत आहे. अजित पवार यांच्या मिरवणुकीमध्ये पार्थ पवार हे त्यांच्या समवेत होते.मुंबईतील मेळाव्या दरम्यान अजित पवार यांच्या पाठीमागेच जय पवार हे देखील त्यांच्या भाषणाच्या वेळेस पूर्ण वेळ थांबून होते. आज जय पवार यांनी देखील बारामतीला भेट दिल्यामुळे भविष्यात नवीन राजकीय समीकरणे उदयास येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राजकारणात आपल्या दोन्ही सुपुत्राने बघण्यासाठी अजित पवार ग्रीन सहल कधी देतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा:

मंत्रालयात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन, वर्धा धरणग्रस्तांनी केले असे…

अंधेरीतील शहाजीराजे भोसले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जलतरण तलाव आजपासुन सुरु…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss