Sunday, May 5, 2024

Latest Posts

India vs Bangladesh, १-१ अशी बरोबरी, शेवटच्या सामन्यात कोण मारणार बाजी?

भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. भारताच्या संघाने बांग्लादेशला टी-२० मालिकेमध्ये पराभूत करत शानदार सुरुवात केली आहे.

भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. भारताच्या संघाने बांग्लादेशला टी-२० मालिकेमध्ये पराभूत करत शानदार सुरुवात केली आहे. त्यानंतर ३ सामान्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला वनडे सामना जिंकून बांग्लादेशच्या संघाने बाजी मारली होती. त्यामुळे भारताच्या संघाने बांग्लादेशकडून पराभूत होण्याची नामूष्की ओढावली. इतकंच नाही, तर बांग्लादेशने विजयासह १-० ने आघाडी घेतल्याने भारताच्या संघासाठी दुसरा सामना हा प्रतिष्ठेचा होता. १९ जुलै रोजी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यांमध्ये भारताच्या संघाने बांग्लादेशवर १०८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या संघाला मालिकेमधील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरा वनडे सामना जिंकणे भाग होते.

भारताच्या संघामधील मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये ऑलराऊंड कामगिरी करत भारताच्या संघाला ‘करो या मरो’ या परिस्थितीत शानदार विजय मिळवून दिला. भारताच्या संघाने दुसरा वनडे सामना जिंकून १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्या तिसऱ्या वनडे सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे आता मालिका रंगतदार स्थितीत पोहचली आहे. या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासह मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना संधी आहे.

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामधील तिसरा सामना २२ जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. हा अंतिम सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका इथे आयोजित करण्यात आला आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्या हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे.

भारताचा महिला संघ
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्मृती मंधाना, प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, देविका वैद्य, मेघना सिंग, पूजा वस्त्राकार, शफाली वर्मा, अंजली सरवानी, मोनिका पटेल, बारेड्डी अनुशा, राशी कनोजिया आणि उमा छेत्री.

बांग्लादेशचा महिला संघ
निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), मुर्शिदा खातून, शर्मीन अख्तर, फरगाना हक, लता मंडल, रितू मोनी, राबेया खान, नाहिदा अक्‍टर, फहिमा खातून, सुलताना खातून, मारुफा अक्‍टर, दिशा बिस्‍वास, शोर्ना अक्‍टर, शांजिदा अक्‍टर, शोभना मोस्‍तरी, शमीमा सुलताना आणि सलमा खातून.

हे ही वाचा:

मुंबईसह मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा

दिल्लीत होणाऱ्या NDA बैठकीला, Eknath Shinde – Ajit Pawar लावणार हजेरी

BMC कथित कोविड घोटाळा प्रकरणात आता SIT पथक ऍक्शनमोडमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss