Saturday, May 4, 2024

Latest Posts

Budget 2024 : बजेटशी संबंधित ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

आता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि वित्त मंत्रालय या कामात व्यस्त आहे. २०२४ - २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.

आता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि वित्त मंत्रालय या कामात व्यस्त आहे. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधीच सूचित केले आहे की यावेळी कोणतीही मोठी घोषणा होण्याची शक्यता कमी आहे आणि यावेळी अर्थसंकल्पावर मतदान केले जाईल. सरकारच्या तिजोरीतून १ फेब्रुवारी ला काय निघणार हे तर अद्याप कोणालाच माहित नाही आहे परंतु बजेटशी संबंधित या काही गोष्टी तुम्ही नक्की जाणून घ्या.

बजेट हा शब्द कुठून आला?

अर्थसंकल्पावर बरीच चर्चा होत असते, पण ‘बजेट’ हा शब्द कुठून आला हे तुम्हाला माहिती आहे का? या विशेष शब्दाची उत्पत्ती फ्रेंच लॅटिन शब्द ‘बुलगा’ पासून झाली आहे, ज्याचा अर्थ चामड्याची बॅग. फ्रेंच शब्द bouguet bulga पासून उद्भवला आहे. यानंतर बोगेट हा इंग्रजी शब्द अस्तित्वात आला आणि या शब्दापासूनच बोजेट हा शब्द उत्पन्न झाला. त्यामुळेच आधी बजेट चामड्याच्या पिशवीत आणले जायचे.

इंग्रजांनी केला पहिला अर्थसंकल्प सादर –

शब्दाची उत्पत्ती झाल्यानंतर देशात सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाबद्दल बोलायचे झाले तर त्याआधी हे जाणून घ्या की, हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात सरकारने जनतेसाठी सादर केलेला अर्थसंकल्प आहे. वर्ष, उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा असतो. त्याची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली आणि भारतातील पहिला अर्थसंकल्प ब्रिटिश काळात सादर झाला. ७ एप्रिल १८६० रोजी देशात प्रथमच अर्थसंकल्प सादर करण्यात आला, जो ब्रिटिश सरकारमधील अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी वाचला.

 

स्वतंत्र भारताचा पहिला सामान्य अर्थसंकल्प –

देशातील पहिला अर्थसंकल्प १८६० मध्ये ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता, तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प १९४७ मध्ये सादर करण्यात आला होता. ब्रिटिशांनी देश सोडल्यानंतर, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी अर्थसंकल्प सादर केला. षण्मुखम चेट्टी, 1892 मध्ये जन्मलेले, वकील, राजकारणी आणि सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ देखील होते.

देशाचा अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर केला नाही –

अर्थसंकल्पीय इतिहासात एकीकडे पंतप्रधानांनी अर्थमंत्र्याऐवजी सामान्य अर्थसंकल्प सादर केला, तर दुसरीकडे असे एक अर्थमंत्री होते ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणतेही बजेट सादर केले नाही. होय, आम्ही केसी नियोगी यांच्याबद्दल बोलत आहोत, जे भारताचे एकमेव अर्थमंत्री होते ज्यांनी या पदावर असतानाही एकही अर्थसंकल्प सादर केला नाही. वास्तविक १९४८ मध्ये ते केवळ ३५ दिवस अर्थमंत्री होते. भारतीय प्रजासत्ताक स्थापनेनंतरचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी २८ फेब्रुवारी १९५० रोजी सादर केला होता.

हे ही वाचा:

प्रजासत्ताक दिनानिमित्त विजय वडेट्टीवार यांनी दिला इशारा,

मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss