Friday, May 17, 2024

Latest Posts

Exclusive: Rahul Gandhi मुंबईत येण्याआधीच Sanjay Nirupam यांची ‘कल्टी’, Fadnavis दाखवणार दिशा

संजय निरूपम यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद झाले आहेत.

राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा घेऊन रविवारी अर्थात १७ मार्च रोजी मुंबईत येणार आहेत. राहुल गांधी यांचा विश्वासू सहकारी असलेले संजय निरूपम यांना खासदार बनण्याची ‘हीच वेळ’ योग्य वाटत असल्याने त्यांनी नवा मार्ग धरायचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचं मिळून एकूणच उद्धव ठाकरे यांना धोबीपछाड करण्याचा जो कार्यक्रम आहे तो नेमका काय आहे, हे दर्शवणारा हा खास रिपोर्ट..

१३ मार्च म्हणजेच बुधवारी सकाळी संजय निरुपम आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते असणारे अशोक चव्हाण यांची आज भेट झाली. या भेटीमधून काय साध्य करायचं, याकडेच सर्वांचे लक्ष होते. तर उत्तर पश्चिम हा जो मतदार संघ आहे हा सध्या खूपच चर्चेचा झालेला आहे. कारण; भाजपवर सर्वात मोठी टीका करण्याचे काम याच मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले.

२०१९ मध्ये याच गजानन कीर्तीकर यांनी संजय निरुपम यांचा पराभव केलेला होता. सर्वांनाचं माहिती असेल, शिवसेनेचा हिंदी भाषिक चेहरा म्हणून ओळखले जात होते. पण एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहणार. म्हणूनच, संजय निरुपम हे शिवसेनेला सोडून बाहेर गेले कारण जी दुसरी तलवार होती त्या तलवारीचं नाव होतं संजय राजाराम राऊत. त्यामुळे या दोन संजय ना एका तलवारी ठेवणं हे काही शिवसेनेला जमलं नाही, किंबहुना शिवसेना प्रमुखांना जमलं नाही आणि त्यामुळे संजय निरुपम यांना बाहेर जावं लागलं. संजय निरुपम त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले आता काँग्रेसमध्ये गेलेले संजय निरुपम हे भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत. आता भाजपमध्येच त्यांना प्रवेश द्यायचा की नाही या द्विधा मनस्थितीत भाजप आहे याचं कारणच असं आहे की, संजय निरुपम यांचं दुखणं हे देखील भास्कर जाधव यांच्यासारखं झालेलं आहे. भास्कर जाधव यांनी विधानसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्टिंग केली होती आणि ती एक्टिंग भाजपच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली होती, तशीच ती अमित शाह यांच्या जिव्हारी लागली होती आणि त्यामुळे भास्कर जाधव यांना भाजपचे दरवाजे बंद झालेले होते.

संजय निरुपम यांनीसुद्धा प्रचंड जिव्हारी लागेल अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. त्यामुळेच, संजय निरूपम यांच्यासाठी सुद्धा भाजपचे दरवाजे बंद झाले आहेत. जर त्यांना पुन्हा निवडणूक लढवायची असेल तर त्यांना भाजपचा कौल लागेल. पण भाजप त्यांना स्वतःकडे घेणार नाही. ही जागा शिवसेनेकडे आहे, म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.कारण; गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेत आणि इथून कीर्तीकरांच्या मुलाला महाविकास आघाडीत न घेता, उद्धव ठाकरे यांनी जागा घोषित केली आहे. अमोल कीर्तिकर आणि गजानन कीर्तिकर यांचा मुकाबला मॅच फिक्सिंगवाला असला तरीही कीर्तिकर यांना ८० वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे तिकीट मिळणार नाही. त्यामुळे ५९ वर्षाचे संजय निरुपम हे आता भाजपमध्ये किंवा कुठल्याही पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत. काँग्रेसमधून त्यांना तिकीट मिळणार नाही असा तर स्पष्ट झाले याचं कारणच आहे की, तिथून अमोल कीर्तिकर महाविकास आघाडीतून लढणार आहेत.

टाईम महाराष्ट्रकडून संजय निरुपम यांना कॉल केला असता, त्यांनी स्पष्ट केले की त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते भेटले नाहीत, परंतु संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असल्याची माहिती टाईम महाराष्ट्रकडे आहे. संजय निरुपम यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे घेण्याबद्दलचा फैसला सुद्धा रवींद्र वायकरांसारखा देवेंद्र फडणवीसच करणार आहेत. संजय निरुपम काँग्रेस सोडण्यासाठी आणि भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवण्यासाठी किंवा शिंदेंकडे जाऊन निवडणूक लढवण्यासाठी हे उतावळे झालेले आहेत.

मुंबईमध्ये जे उत्तर भारतीय आहेत त्यांच्यासाठी नेता शिल्लक राहिलेला नाही. आपण निवडणूक लढवायची असेल तर ती हीच वेळ आहे आता नाही तर कधी नाही असे संजय निरुपम यांनी ठरवले आहेत आणि त्यामुळेच अशोक चव्हाण यांचा प्रभाव असलेले संजय निरुपम यांनी त्यांची आज भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नांदेडच्या विमानतळावर काही मिनिटं अशोक चव्हाण यांच्याबरोबर चर्चा केली होती, बातचीत केली होती. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की, अशोक चव्हाण यांचे गुडविल हे आता काल-परवा येऊन ही भाजपमध्ये कशा स्वरूपाचा झालेले आणि त्यामुळे प्रत्येक खासदार महत्त्वाचा असताना संजय निरुपम सारखा उत्तर भारतीयांचा चेहरा असलेला तुलनेने तरुण असलेला, दिल्लीतल्या कामकाजाची जाण असलेला आणि दोन्हीकडे व्यवस्थि जुळवून घेऊन, निवडून येऊ शकणारा खासदार जर मिळत असेल तर काय हरकत आहे, असा बोलबाला सगळीकडे होताना दिसून येत आहे.राहुल गांधी अवघ्या काही तासाने म्हणजे रविवारी मुंबईत येतील पण त्याआधीच संजय निरुपम हे काँग्रेसला गुडबाय करतील आणि दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी निघतील अशी एकूणच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

झी चित्र गौरव २०२४ सोहळ्यात ‘उषा मंगेशकर’ यांना “जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राहुल गांधी यांच्या सभेपूर्वी मनसेचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss